Eknath Shinde Politics : एकनाथ शिंदेंची अखेरची फडफड; लोकसभेनंतर त्यांचे राजकारण संपणार : शिवसेना नेत्याचे भाकीत

Lok Sabha Elevtion 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या लोकसभा निवडणुकीत अखेरची फडफड सुरू आहे, त्यांचे राजकारण लवकरच संपेल, असा दावा शिवसेना नेते खासदार राऊत यांनी केला आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama

Nashik, 12 May : शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रचार दौऱ्यावर आहेत. शनिवारी त्यांच्या नाशिक येथे दोन सभा झाल्या. या दौऱ्यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टीकेचे लक्ष्य केले आहे.

सध्याच्या लोकसभा निवडणुकीत सुरू असलेल्या प्रचारावर मतदारांचे अतिशय बारीक लक्ष आहे. महायुतीकडून कितीही दबाव आणि आरोप होत असले तरी मतदार त्यांना बळी पडणार नाहीत, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांची या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election)अखेरची फडफड सुरू आहे, त्यांचे राजकारण लवकरच संपेल, असा दावा शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath Shinde
Solapur Lok Sabha : सातपुतेंची स्वप्नपूर्ती शहर उत्तर, अक्कलकोटवर ठरणार; शिंदेंना पंढरपूर, शहर मध्य, दक्षिणचा ‘हात’?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या पाच दिवसांत दोनदा नाशिकचा दौरा केला आहे. त्यांची सर्व धावपळ ‘डॅमेज कंट्रोल’साठी आहे. त्यावर राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्षमता आणि प्रभावावर गंभीर प्रश्न निर्माण केला आहे. मुख्यमंत्री या निवडणुकीत पुरवठा करायला येत असतील, असा टोमणा राऊत यांनी मारला.

ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण चोरला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे असो उपमुख्यमंत्री अजित पवार अथवा देवेंद्र फडणवीस यांनी टेम्पो भरून पैसे आणू द्या, त्याचा काहीही परिणाम होणार नाही. लोक त्यांना अजिबात मतदान करणार नाही. एवढेच काय खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाण मांडले, तरीही काहीही परिणाम होणार नाही, असे त्यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीवर भाष्य केले.

Eknath Shinde
Lanke On Ajitdada Statement : नीलेश लंके अजितदादांना भेटणार, महायुतीत धाकधूक वाढली...

महायुतीच्या नेत्यांविषयी बोलताना ते म्हणाले, तीनही पक्षांचे नेते तन मन धनाने काम करीत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाच्या निवडणुका संपल्या आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांची धावपळ सुरू आहे. ‘डॅमेज कंट्रोल’साठी ते कासावीस झाले आहेत.

यंदाची लोकसभा निवडणूक शिंदे यांची अखेरची निवडणूक असेल, त्यामुळे त्यांची फडफड सुरू आहे. यावरून महायुतीने पराभवाचा धसका घेतला आहे, असे स्पष्ट दिसते. महाविकास आघाडीला अतिशय पोषक वातावरण आहे. चांगला प्रतिसाद मिळत आहे. किमान ३५ जागा जिंकू असा दावाही खासदार संजय राऊत यांन केला.

Eknath Shinde
PDCC Bank Case : PDCC बॅंक मॅनेजरवरील कारवाई ही निव्वळ धूळफेक, ‘ते’ फुटेज सार्वजनिक करा; रोहित पवार आक्रमक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com