Minister Manikrao Kokate receives temporary relief as court stays his sentence in the fake document housing scam case. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manikrao Kokate यांची आमदारकी वाचणार? नाशिक सत्र न्यायालयाची शिक्षेला स्थगिती

Nashik Court Puts Hold on Minister Manikrao Kokate’s Conviction : मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला नाशिक जिल्हा न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

Hrishikesh Nalagune

Nashik News : मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेच्या अंमलबजावणीला सत्र न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. तर शिक्षेच्या स्थगितीसाठी न्यायालयात उद्या स्वतंत्र सुनावणी होणार आहे. सदनिका खरेदी करताना बनावट कागदपत्र दिल्याचा आणि खोटे उत्पन्न दाखवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी त्यांना कनिष्ठ न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.

या शिक्षेविरोधात कोकाटे यांनी सत्र न्यायालयात अपिल केले होते. याची सुनावणी आज (24 फेब्रुवारी) पार पडली. यावेळी न्यायालयाने कोकाटे (Manikrao Kokate) यांना तात्पुरता दिलासा देत शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. तसेच एक लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीनही मंजूर केला आहे.

या सगळ्याबाबत कोकाटे यांच्या वकिलांनी सांगितले की, अपिल प्रकरण संपेपर्यंत शिक्षेच्या अंमलबाजवणीला स्थगिती मिळाली आहे. तसेच जामीन मंजूर झाला आहे. शिक्षेला स्थगिती आणि दोन वर्षांच्या अपात्रतेचा जो प्रश्न आहे, त्यावर न्यायालय उद्या स्वतंत्र ऑर्डर करणार आहे. त्यासंबंधी सरकारी वकील आपली बाजू मांडणार आहेत.

जाणकारांच्या मते शिक्षेला स्थगिती मिळाली तरत कोकाटे यांच्या आमदारकीला कोणताही धोका राहणार नाही. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबाबतही सुरत न्यायालयाच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे त्यांची खासदारकीही बहाल करण्यात आली होती.

कोकाटे यांच्यावर काय होते आरोप?

सिन्नर शहरातील येवलेकर मळा या उच्चभ्रू परिसरातील नागरी कमाल जमीन धारणा कायदा अंतर्गत अतिरिक्त जमिनीवर सदनिका बांधकाम करण्यात आले होते. त्यामध्ये केवळ आर्थिक दुर्बल आणि घर नसलेल्या व्यक्ती अशी पात्रता होती. त्यासाठी कोकाटे बंधूंनी बनावट पुरावे सादर करून आर्थिक दुर्बल असल्याचे शासनाला सांगितले होते.

यामध्ये शासनाची फसवणूक झाल्याची तक्रार तत्कालीन आमदार आणि मंत्री तुकाराम दिघोळे यांनी केली होती. दिघोळे यांनीच या प्रकरणाचा प्रदीर्घ काळ पाठपुरावा केला होता. याच दरम्यान, 30 नोव्हेंबर 2019 मध्ये दिघोळे यांचे निधन झाले. पण त्याचा निकाल नुकताच लागला. यात कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT