Nashik Gangapur Police Station Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Crime News : माजी विद्यार्थ्याने प्राध्यापिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; व्हिडीओ अन् चॅट्स व्हायरल करण्याची धमकी देत 5 लाखांची मागणी

Nashik Former Student Accused of Harassing Professor : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना झालेल्या ओळखीचा फायदा उठवत विद्यार्थ्यानेच चक्क महिला प्रोफेसरला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं.

Ganesh Sonawane

Nashik professor blackmail case : शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील नाते हे गुरु-शिष्याच्या विश्वासावर आधारलेले असते. मात्र, या नात्याला छेद देणाऱ्या काही घटना समोर येतात.नाशिकमध्येही अशीच एक धक्कादायक घटना घडली असून, या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

महाविद्यालयात शिक्षण घेत असताना झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका माजी विद्यार्थ्याने महिला प्राध्यापिकेचा ऑनलाइन छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्राध्यापिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर संशयीताने तिचे खासगी व्हिडिओ आणि चॅट्स सार्वजनिक करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

खासगी व्हिडिओ आणि चॅट्स व्हायरल न करण्याच्या बदल्यात संशयित तरुणाने प्राध्यापिकेला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली.त्याने पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. याप्रकरणी संशयित चेतन राजाराम आढे ऊर्फ राठोड (रा. अंबड, जालना) याला नाशिकच्या गंगापूर पोलिसांनी अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित चेतन हा पीडित महिला प्राध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या महाविद्यालयात पूर्वी शिक्षण घेत होता.काही दिवसांनी प्राध्यापिकेची बदली झाल्याने संशयिताने पुन्हा त्यांच्याशी संपर्क वाढवला.विश्वास संपादन करून त्याने प्राध्यापिकेला प्रेमसंबंधात ओढल्याचा आरोप फिर्यादीत आहे. चेतन प्राध्यापिकेला फोन करत असे, तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर बोलता, बोलता त्याने व्हिडिओ कॉलवर अश्लील व्हिडिओ स्क्रीन रेकॉर्ड केले.

संशयित चेतन याने प्राध्यापिकेला महाराष्ट्राबाहेर एका आठवड्याच्या ट्रिपला येण्यासाठी दबाव टाकला. मात्र प्राध्यापिकेने त्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर संशयिताने त्यांना व्हिडिओ कॉल आणि चॅट्स व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने प्राध्यापिकेकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. त्यामुळे अखेर पीडित प्राध्यापिकेने गंगापूर पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी संशयित चेतन राठोड याच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान आणि अनुसूचित प्रतिबंधक कायद्यानवे गुन्हा दाखल केला केला असून, त्याला अटक केली आहे. त्याची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT