

Nida Khan TCS Case : नाशिकमधील TCS या बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत उघडकीस आलेल्या महिलांचे लैगिंक शोषण व एका तरुणाचे बळजबरी करण्यात आलेले धर्मांतर प्रकरणातील संशयित आरोपी निदा एजाज खान हिच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गरोदर असलेल्या निदा खानसमोर आता नवं संकट उभं ठाकलं आहे.
आठ महिन्यांची गर्भवती असलेल्या निदा खानसमोर न्यायालयीन प्रक्रियेसोबतच वैवाहिक आयुष्याचेही संकट उभे राहिले आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यापासून निदाच्या कुटुंबात कलह निर्माण झाला असून हा कलह आता विकोपाला पोहोचल्याचे चित्र आहे. तिच्या पतीने न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. त्यानुसार न्यायालयाने निदाला समन्स बजावले असून, १६ ऑक्टोबर रोजी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
निदाचे दोन ते तीन वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. टीसीएस कंपनीत ती जॉब करत होती. मात्र, कंपनीच्या नाशिकमधील युनिटमध्ये घडलेल्या धर्मांतर व तरुणींचे लैगिंक शोषण प्रकरणात निदाचे नाव संशयित म्हणून पुढे आले. या प्रकरणामुळे झालेली प्रचंड बदनामी आणि ओढावलेल्या नामुष्कीमुळे खचून जात तिच्या पतीने अखेर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.
नाशिकच्या देवळाली कॅम्प येथील पोलीस ठाण्यात संबधित कंपनीत कर्मचारी असलेल्या पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून निदा खानसह दानिश शेख, तौसिफ अत्तार, छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल आणि तिला आश्रय देणारा घरमालक हानिफ शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याशिवाय, मुंबई नाका पोलीस ठाण्यात याच कंपनीतील एका तरुणाच्या तक्रारीवरून तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी, रझा मेमन याच्यासह निदा खान हिच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तरुणाचे बळजबरी धर्मांतर केल्याचा आरोप निदासह संशयितांवर आहे. या दोन्ही प्रकरणांत नाशिकरोड आणि नाशिक जिल्हा न्यायालयाने तिला सशर्त जामीन मंजूर केला आहे.
तरुणाचे धर्मांतर व तरुणींचे लैगिंक शोषण प्रकरणात निदा खानवर गंभीर आरोप असून, पोलिस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेच्या सावटात तिच्या वैवाहिक आयुष्यातील तणावही वाढला आहे. एकाबाजूला निदा गर्भवती असून दुसरीकडे न्यायालयीन लढाई, सामाजिक दबाव आणि संसार तुटण्याची भीती अशा अनेक पातळ्यांवर निदा अडचणीत सापडल्याचे दिसत आहे.
यापूर्वी निदा खान गर्भवती असल्याने न्यायालयाने तिला सहानुभूती दाखवली होती. तिच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने भगवान श्रीकृष्णाचा जन्माचा दाखला दिला होता. भगवा श्रीकृष्णाचा जन्म तुरुंगात झाला. परंतु आजच्या आधुनिक आणि सुसंस्कृत समाजात कोणत्याही निष्पाप नवजात बाळाला तुरुंगातील वातावरणाचा सामना करावा लागू नये. असे निरीक्षण नोंदवत कोर्टाने तिला जामीन दिला होता. पंरतु आता बाळाच्या जन्मापूर्वीच तिचे वैवाहिक आयुष्य धोक्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.