Dada Bhuse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dada Bhuse : वादाला तोंड ! शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे कार्यालय थेट शाळेत, विद्यार्थ्यांचे काय होणार?

Dada Bhuse’s office proposal in a Nashik municipal school sparks controversy : सध्या राज्यात हिंदी सक्तीच्या निर्णयावरुन वादंग सुरु आहे. अशातच नाशिकमधून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. हा विषय पुढील काळात राजकीय वादाचा मुद्दा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Ganesh Sonawane

Nashik News : सध्या राज्यात हिंदी सक्तीच्या निर्णयावरुन वादंग सुरु आहे. महायुती सरकारच्या निर्णयानुसार, राज्यातील मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांना इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकवावी लागणार आहे. मात्र राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना व सर्व विरोधी पक्ष हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरुन आक्रमक झाले आहेत. मुंबईत 5 जुलै रोजी मनसे व उबाठाचा एकत्रित मोर्चा या विरोधात आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना याविषयावर सर्वांना तोंड देण्याचं मोठं आव्हान आहे. अशातच नाशिकमधून दादा भुसे यांच्यासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे.

शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या नाशिक येथील संपर्क कार्यालयासाठी प्रभाग क्रमांक ७ मधील पोलीस वसाहतीत स्थित महापालिकेच्या शाळेतील जागा वापरण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात असून यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे काय? त्यांच्या शिक्षणावर परिणाम होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हा विषय पुढील काळात राजकीय वादाचा मुद्दा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणावर महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी मिता चौधरी यांच्याशी दै. सकाळच्या प्रतिनिधींनी संपर्क साधण्यात आला असता, त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही.

नाशिक महापालिकेच्या एकुण ८८ प्राथमिक व बारा माध्यमिक शाळा आहेत. दोन्ही शाळांचे मिळून ३२ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्याने ती वाढविणे आवश्यक असल्याचा मुद्दा खुद्द शिक्षणमंत्री भुसे यांनी महापालिकेच्या एका बैठकीत अधोरेखित केला होता. त्यावरु त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच शाळाही घेतली होती. विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

मात्र, आता त्याच शिक्षण मंत्र्यांच्या विशेष कार्यालयासाठी प्रभाग क्रमांक सातमधील पोलिस आयुक्त कार्यालयामागे असलेल्या पोलिस वसाहतीतील महापालिकेची विद्यानिकेतन शाळा क्रमांक १६ या शाळेत कार्यालय स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे हा विषय येत्या काळात अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या दोन मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ई-लर्निंग सेंटर आणि दुसऱ्या मजल्यावर सर्व शिक्षा अभियानाचे कार्यालय कार्यरत आहे. २८ एप्रिल रोजी शिक्षणमंत्र्यांच्या कार्यालयाकडून महापालिकेकडे संपर्क कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानंतर ३ जूनला वास्तुविशारद आणि कार्यालयीन प्रमुखांनी पाहणी केली. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर कार्यालय अधिक्षक, स्वीय सहाय्यक तसेच इतर कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष व अभ्यागत कक्ष उभारण्याची योजना आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT