North Maharashtra local body elections postponed Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Local Body Elections : उत्तर महाराष्ट्रातील दोन ठिकाणच्या निवडणुकांना आयोगाकडून स्थगिती, समोर आलं मोठं कारण..

Manmad Pimpalner election postponed : नगर परिषद निवडणुकीसंदर्भात मोठी अपडेट समोर येत असून उत्तर महाराष्ट्रातील नाशिक व धुळे जिल्ह्यातील दोन जागी निवडणूक स्थगित करण्यात आली आहे.

Ganesh Sonawane

ECI postpones municipal elections Maharashtra: राज्यभरात नगरपालिका व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. काल निवडणूक चिन्ह वाटपाची प्रक्रिया पार पडल्याने आता प्रचाराला वेग येणार आहे. 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 3 डिसेंबर रोजी लागणार आहे. परंतु या रणधुमाळीत उत्तर महाराष्ट्रातील नाशिक व धुळे जिल्ह्यातील दोन ठिकाणच्या निवडणुका स्थगिती करण्यात आल्या आहे.

नाशिक जिल्ह्यातील मनमाड नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १० मधील उमेदवार नितीन वाघमारे यांचा मृत्यू झाल्याने प्रभाग क्रंमाक १० ची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने याबाबत अधिकृत पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.

मनमाड नगरापालिकेत प्रभाग क्रमांक १० अ मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फ नितीन अनिल वाघमारे हे निवडणूक लढवत होते. परंतु निवडणुकीची धामधुम सुरु असतानाच नितीन वाघमारे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे.

धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथील प्रभाग क्रमांक दोनच्या उमेदवार कुसुमबाई पाथरे यांचेही निधन झाले. भाजपकडून प्रभाग 2 ब मध्ये कुसूमबाई खंडू पाथरे (वय ७५) या देखील निवडणुकीच्या रिंगणात होत्या. पण त्यांचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

प्रभाग 2 ब मध्ये तिरंगी लढत होती. यात कुसुमबाई पाथरे (भाजप), आशा महेश वाघ (काँग्रेस) व वसिमा आबिद शेख (शिवसेना) या उमदेवारांचा समावेश होता. पैकी कुसुमबाई यांचे आकस्मिक निधन झाल्याने आता या प्रभागातील निवडणूक आता स्थगित करण्यात आली आहे.

त्यामुळे या दोन्ही जागांसाठीची निवडणूक स्थगित केली आहे. मात्र, या दोन्ही प्रभागांत नगराध्यक्षपदाची निवडणूक ठरल्याप्रमाणे होणार आहे. तसेच, दोन्ही प्रभागांमधील सदस्यांच्या निवडणुकीसाठी नव्याने कार्यक्रम घोषित केला जाईल, असेही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले.

बीडमध्येही निवडणूक स्थगित..

याशिवाय मराठवाड्यातही बीड जिल्ह्यातील गेवराई नगरपरिषद येथील प्रभाग 11 चे उमेदवार श्रीमती दुरदाना बेगम सलीम फारुकी यांचही निधन झाल्यानं या प्रभागातील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील दोन व मराठवाड्यातील एक असे राज्यातील तीन ठिकाणच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT