Bharti Pawar - Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dindori Constituency 2024 : छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात डॉ. भारती पवार किती आघाडी घेणार?

Mahayuti politics, Bhujbal's reputation is the majority of votes in Yevla : डॉ. भारती पवार यांच्या मताधिक्यासाठी येवल्यात छगन भुजबळ लागले कामाला..

Sampat Devgire

Chhagan Bhujbal News : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या डॉ. भारती पवार विरोधकांशी झुंज देत आहेत. गेल्या दोन निवडणुकांत भाजपला आघाडी मिळाली आहे. यंदा मंत्री छगन भुजबळ देखील त्यांच्या मदतीला आहेत. त्यामुळे या निवडणुकीत त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.

लोकसभा निवडणुकीत येवला मतदार संघ महत्त्वाचा आहे. येथे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला माणणारा वर्ग येवला शहरात आहे. त्यामुळे भाजपची यंत्रणा म्हणून येथे युतीच्या उमेदवाराला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 2014 च्या निवडणुकीत भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण यांना या मतदारसंघातून 53 हजार मतांची आघाडी मिळाली होती. 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या विद्यमान खासदार डॉ. पवार यांना 28 हजार 120 मतांची आघाडी होती. त्यामुळे सध्या प्रमुख विरोधक असलेले मंत्री भुजबळ हे देखील भाजपचा भाग बनले आहेत. अशा स्थितीत भाजपच्या उमेदवार डॉ. पवार यांना किती आघाडी मिळते हा उत्सुकतेचा विषय आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभेच्या आजवरच्या निवडणुका शिवसेना-भाजप युती विरुद्ध काँग्रेस आघाडी अशा होत आलेल्या आहेत. यामध्ये मंत्री छगन भुजबळ हे काँग्रेस आघाडी कडून प्रचार करीत आले आहेत. यंदा पहिल्यांदाच राज्यात घडलेल्या घडामोडींमध्ये भुजबळ उपमुख्यमंत्री अजित पवार (AJIT PAWAR) यांच्या गटात सहभागी झाले आहेत. हा गट महायुतीचा भाग आहे. त्यामुळे भुजबळ यांनी महायुतीत प्रवेश केल्याने येवल्यातून उमेदवाराला किती आघाडी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.भाजपच्या उमेदवार डॉ. पवार यांच्या प्रचारासाठी मंत्री भुजबळ यांनी नुकतीच येवल्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली.

या बैठकीत लोकसभा (LOK SABHA) निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या सूचनांचे दखल घेऊन यंदा महायुतीच्या उमेदवाराला सगळ्यात मोठी आघाडी देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.कार्यकर्त्यांनी व्यक्तिगत नाराजी आणि मनातील सल बाजूला ठेवून महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करावयाचा आहे. त्यात सगळ्यांनी संघटितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकास कामांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचावी असे आवाहन भुजबळ यांनी केले. येवला हा मंत्री छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे भुजबळ यांच्या सुचनेची महायुतीतील सहकारी पक्षांचे नेते देखील वाट पाहत होते.

(Edited by : Chaitanya Machale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT