Sharad Pawar: मोदींच्या कार्यकाळात दोन राज्याचे मुख्यमंत्री तुरुंगात; शरद पवारांनी डागली तोफ

Sharad Pawar On Narendra Modi: "संविधानाला धक्का लावणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत असले तरी त्यांचा संविधानावर आक्षेप आहेच व त्यांचे खासदारच तसे बोलत आहेत. त्यामुळे राज्यघटनाच बदलून मोदींना जनतेचे अधिकार उध्वस्त करायचे आहेत."
Sharad Pawar, Narendra Modi
Sharad Pawar, Narendra ModiSarkarnama

Lok Sabha Election 2024: "संविधानाला धक्का लावणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणत असले तरी त्यांचा संविधानावर आक्षेप आहेच व त्यांचे खासदारच तसे बोलत आहेत. त्यामुळे राज्यघटनाच बदलून मोदींना जनतेचे अधिकार उध्वस्त करायचे आहेत", असा घणाघात ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी नगरच्या सभेत केला. महात्मा गांधी व राष्ट्रसंत आनंदऋषीजी महाराज यांच्या शांती संदेशातील अडथळा नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे परिवर्तन गरजेचे आहे, असंही पवार यावेळी म्हणाले.

महाविकास आघाडीचे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार माजी आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या प्रचारासाठी शरद पवारांनी (Sharad Pawar) नगरमध्ये सभा घेतली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत, आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार रोहित पवार, अंकुश काकडे, नितेश कराळे मास्तर, उत्तम जानकर, दादा कळमकर, चंद्रहार पाटील, संतोष वेताळ, अभिषेक कळमकर, भगवान फुलसौंदर, किरण काळे इत्यादी नेते या सभेसाठी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या सभेत बोलताना शरद पवार म्हणाले, "स्वातंत्र्य लढ्यात पुढाकार घेणार्‍या अहमदनगर जिल्ह्यात आज वेगळी संस्कृती आली आहे. मोदींच्या राज्यात देशात लोकशाही राहणार की नाही? याची चिंता आहे. दोन मुख्यमंत्री कारागृहात आहेत. सत्तेचा गैरवापर यामागे आहे. जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. घटना बदलातून सर्व अधिकार आपल्याकडे ठेवण्याचा डाव असून, त्यासाठी जागे व्हावे लागेल". समाजा-समाजात अंतर ते वाढवत असले तरी देश विकासासाठी सर्वांना एकत्र ठेवणे आवश्यक असल्याचं पवार म्हणाले.

अनिल देशमुखांचे 'लाव रे तो व्हिडिओ...'

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी या सभेत 'लाव रे तो व्हिडिओ', असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फेक आश्वासनांचे व्हिडिओ लावले. पंतप्रधान मोदींच्या (Narendra Modi) आश्वासनांचा फोलपणा दाखवण्यासाठी माजी मंत्री अनिल देशमुखांनी लाव रे तो व्हिडिओला सभेतील लोकांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आणि प्रत्येकाला घरकुल देण्याचे मोदींचे भाषण अनिल देशमुखांनी ऐकवले.

Sharad Pawar, Narendra Modi
Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा कसब्यात फटका; आता बारामतीत काय होणार?

पंतप्रधान मोदींच्या आश्वासनांनुसार देशात सर्व काही झाले का? असा प्रश्न अनिल देशमुखांनी केला. तसेच हे चित्र बदलण्यासाठी शरद पवारांचे देशात हात बळकट केले पाहिजेत. दिल्लीला महाविकास आघाडीचे खासदार पाठवले पाहिजेत. देशात महाविकास आघाडी इंडियाची, तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार निश्चित आहे, असा देखील दावा देशमुखांनी यावेळी केला.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com