Nashik News, 13 Jul : नाशिक जिल्हा बँक आर्थिक संकटात आहे. या बँकेच्या 182 कोटींच्या वसुलीची नोटीस माजी संचालकांना बजावण्यात आली आहे. मात्र हेच संचालक पुन्हा एकदा मुलांमार्फत बँक ताब्यात घेण्याच्या तयारीला लागले होते.
नाशिक जिल्हा बँकेवर राज्य सहकारी बँकेचा प्रतिनिधी प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. या प्रशासकांनी बँक आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र सहकारात रुळलेले हे अधिकारी बँकेच्या निवडणुकीचा विचार करत आहेत. यांचे हे स्वप्न राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी उध्वस्त केले आहे.
जिल्हा बँक अडचणीत आहे. बँकेची वसूली रखडलेली आहे. ही वसूली होऊ नये यासाठी त्यात सत्ताधारी पक्षाचेच राजकीय नेते अडथळे आणत आहेत. या संदर्भात बँकेच्या नेमक्या दुखण्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी निदान केले आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य शासनाला पत्र लिहून जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या हालचालींना ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा बँक आर्थिक संकटात लोटणारे आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांकडून त्यांच्याच पुढच्या पिढीला जिल्हा बँकेत पाठविण्याची जोरदार तयारी सुरू आहे. ज्यांनी बँक संकटात आणली तेच पुन्हा मुलांच्या माध्यमातून बँकेचा ताबा घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा संताप ठेवी दारांमध्ये होता.
सभासदांच्या मनातील दुखणे आणि बँकेची खरी अडचण दूर करण्यासाठी मंत्री भुजबळ यांनी पहिले पाऊल टाकले आहे. तो पर्यंत बँक अडचणीतून बाहेर पडत नाही तो पर्यंत निवडणुका घेऊ नयेत अशी ठाम भूमिका भुजबळ यांनी घेतली आहे. त्यासाठी त्यांनी राज्य शासनाला पत्र देखील लिहिले आहे. त्या बँक वाचविण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल भुजबळ यांनी टाकले.
एक म्हणजे जिल्हा बँकेच्या राजकारणात त्यांनी कधीही भाग घेतला नाही, हे विशेष. जिल्ह्यात चार मंत्री आहेत. यातील काही नेते हे प्रदीर्घकाळ बँकेच्या सत्तेत राहिले आहेत. या सत्तेच्या माध्यमातूनच त्यांनी आपले राजकीय बस्तान बसवले. मात्र सध्या बँक अडचणीत असताना वसूली आणि अन्य कामकाजात त्यांच्याकडून किती सहकार्य मिळते हा सभासदांमध्ये चर्चेचा विषय आहे.
जिल्हा बँकेच्या आर्थिक अडचणीत आणि समस्यांमध्ये वाढ करण्यात आज सत्ताधारी पक्षात असलेले बहुतांश आमदार आणि काही मंत्री यांचा भरपूर सहयोग राहिला आहे. विशेष म्हणजे बँक शेवटच्या घटका मोजत असतानाही त्यांचे समर्थक मात्र या नेत्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे दुर्दैवी राजकीय चित्र पाहायला मिळते. याबाबत परखडपणे भूमिका घेण्यासाठी सभासद पुढे येतील का याचीही चर्चा या निमित्ताने होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.