
Nagpur Scam News : नागपूर विभागातील शालार्थ आयाडी आणि शिक्षक भरतीचा घोटाळा चांगलाच गाजत आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी या घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापना केली आहे. यातच आज (ता.12) भाजप नेते तथा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीसुद्धा आपल्या भाषणात या घोटाळ्यावरून महायुतीला घराचा आहेर दिला आहे. या घोटाळ्यावरून सरकारचे लक्ष वेधताना त्यांनी, 'मला माहिती आहे शिक्षणाधिकार काय करतात? काय मागतात? आणि नंतर जेलमध्ये जातात'. 'मात्र सरकारला कोण अक्कल सांगणार', असा सवालही त्यांनी केला. नागपूर सहोदया स्कूल कॉम्प्लेक्स या संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रादेशिक प्राचार्य परिषदेते ते बोलत होते. (Union Minister Nitin Gadkari expressed concern over the ongoing Shalarth ID and teacher recruitment scam in Nagpur)
पुढे ते म्हणाले, शाळा सुरू करण्यासाठी अनेक अडचणी येतात. याची मला जाणीव आहे. शिक्षणाधिकारी काय करतो? हे मला चांगलेच माहीत आहे. मात्र कोणी काही करू शकत नाही. त्याला जाब विचारण्याची कोणाची हिंमत नाही. मात्र या समस्येवर आपल्याच उत्तर शोधावे लागले. चांगल्या शालेय संस्था सुरू करणे सोपे काम नाही. त्यात अनेक अडचणी आहेत. समस्या आहेत.
अधिकारी काय करतात हे सुद्धा मला चांगलेच ठावूक आहे. मी महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शाळांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. त्यात मीसुद्धा होतो. त्यावेळी जिथे शाळा आहे तिथे शिक्षक नाही, जिथे शिक्षक आहे तिथे विद्यार्थी नसल्याचे आढळून आले होते असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.
नागपूर विभागातील शालार्थ आयडी घोटाळा सध्या चांगलाच गाजत आहे. एका मृत झालेल्या शिक्षणाधकाऱ्यांची वनावट स्वाक्षरी करून शेकडो शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. संबंधित शिक्षकाच्या नावावर एरिअस काढून ते घोटाळेबाज अधिकारी आणि शिक्षण संस्था चालकांनी वाटून घेतले आहे.
या प्रकरणी अनेक अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. काही जेलमध्ये आहेत तर अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत आहेत. भाजपचे आमदार प्रवीण दटके आणि आमदार संदीप जोशी यांनी या घोटाळ्याकडे विधानसभा आणि विधानपरिषेद सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यापूर्वी दोघांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन देऊन घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली होती.
यानंतर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आएएस आणि आपीएस अधिकाऱ्यांची एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या तीन अध्यक्षांवर आतापर्यंत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यापैकी दोघांना पोलिसांनी अटकसुद्धा केली आहे. यावरून घोटाळ्यात शिक्षण विभागातील सारेच अधिकारी लिप्त असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.