Chandrakant Patil: 'अमित शहांना भेटण्यासाठी आधी लोक माझ्याकडे पाहायचे, पण आता मलाही...'; चंद्रकांतदादांचं मोठं विधान

BJP Politics : केंद्रामध्ये मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपद मिळणं, हे अनपेक्षित होतं. कारण खासदार झाल्यानंतर मध्ये पाच-दहा वर्ष जावी लागतात. त्यानंतर मंत्रिपद मिळत असतं. मात्र, मोहोळ हे भाग्य घेऊनच जन्माला आले आहेत.
Chandrakant Patil Murlidhar Mohol Amit Shah .jpg
Chandrakant Patil Murlidhar Mohol Amit Shah .jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना अनेपक्षितरित्या केंद्रात राज्यमंत्रिपद मिळालं. मोहोळ यांना थेट केंद्रात राज्यमंत्रिपद मिळेल याचा अंदाज कोणालाच नव्हता. तसेचआता मलाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांच्याशी बोलावं लागतं, असं मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितले.

केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक विभाग राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने "24 तास जनसंपर्क कार्यालय" शुभारंभ व प्रथम वर्ष कार्यअहवाल प्रकाशन तसेच कोरोना काळातील अनुभव कथन करणारे " प्रथम माणूस"पुस्तक प्रकाशन या कार्यक्रमांचे आयोजन शनिवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्ष प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण,उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, केंद्रामध्ये मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना मंत्रिपद मिळणं हे अनपेक्षित होतं, कारण खासदार झाल्यानंतर मध्ये पाच-दहा वर्ष जावी लागतात. त्यानंतर मंत्रिपद मिळत असतं. मात्र, मोहोळ हे भाग्य घेऊनच जन्माला आले आहेत. नगरसेवक, स्थायी समिती सदस्य, नंतर अध्यक्ष, महापौर त्यानंतर त्यांनी डायरेक्ट उडी मारली आणि ते खासदार झाले. त्यानंतर लागणारं वेटिंग पिरेड चुकवत ते केंद्रात मंत्रीही झाले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केंद्रात दोन मंत्रिपद आहेत, तरीदेखील ते वेळ काढून शहरातील प्रश्नांवरती तोडगा काढण्यासाठी जनसंपर्क ठेवतात. त्यामुळे आण्णा माणसातला नेता आहेत, असं म्हणावं लागेल.

Chandrakant Patil Murlidhar Mohol Amit Shah .jpg
Ravindra Chavan: भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षांनी महायुतीवरच टाकला बॉम्ब; म्हणाले,...तर आम्ही उद्धव ठाकरेंनाही सोबत घेऊ!

मी गुजरातमध्ये दहा वर्ष काम केले असल्याने अमित शहा यांना भेटण्यासाठी आधी लोक माझ्याकडे पाहायचे. पण आता मलाही अमितभाईंसाठी अण्णाला भेटावे लागते, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

मुरलीधर मोहोळ आता अण्णा झाले आहेत, आपल्याला आता लक्षात आले पाहिजेत. ते केंद्रीय मंत्री झाले आहेत. त्यांना केंद्राची कामं आहे, पण त्यांच्याकडून पुण्यातील लोकांच्या फार अपेक्षा आहेत. त्यामुळे अण्णाला सूचना करतो की, पुणेकरांशी असलेली नाळ तोडू नका, काम करत राहा असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com