Maharashtra election : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या (Aadivasi vikas mahamndal election) पंचवर्षिक निवडणुकीत १७ जांगासाठी ६४ उमेदवारांनी ९९ अर्ज दाखल केले होते. माघारीसाठी ३१ ऑक्टोबर पर्यंतची मुदत होती. माघारीच्या अंतिम दिवशी २१ उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून आता ४३ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.
विशेषत: नाशिक गटातून तगडी लढत व चुरस पाहायला मिळणार आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ, आमदार हिरामण खोसकर यांचे पुत्र वामन खोसकर यांसह माजी आमदार जे. पी. गावित यांचे पुत्र इंद्रजित गावित, माजी आमदार शिवराम झोले रिंगणात राहिल्याने यांच्यात लढत होणार आहे. आजी-माजी आमदारांच्या वारसांमध्ये चुरस रंगणार असल्याने निवडणुकीपूर्वी वातावरण तापले आहे.
तब्बल पंधरा वर्षांनी म्हणजे २०१० नंतर होत असलेल्या या निवडणुकीसाठी यंदा विक्रमी अर्ज दाखल झाले होते. नाशिक गटातून ९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, सर्वाधिक १० अर्ज महिला राखीव गटातून प्राप्त झाले होते. मात्र यातील काही उमेदवारांनी माघार घेतली. माघार घेणाऱ्या उमेदवारांमध्ये प्रामुख्याने माजी आमदार निर्मला गावित, जे. पी. गावित, विनायक माळेकर, कमल माळेकर, भरत माणिकराव गावित यांचा समावेश आहे.
पुणे- रायगड- अहिल्यानगर गटातून आठ इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. परंतु माजी मंत्री (कै.) मधुकर पिचड यांचे पुत्र माजी आमदार वैभव पिचड यांनी मोठी खेळी केली. सर्व उमेदवारांची समजूत त्यांनी काढल्याने उर्वरित सर्व सात उमेदवारांनी माघार घेतली. आता वैभव मधुकर पिचड यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिला आहे.
तसेच अमरावती गटातूनही पाच उमेदवारांना अर्ज दाखल केले होते. यात आमदार केवळराम काळे यांना इतर उमेदवारांची समजूत घालण्यात यश आल्याने इतरांनी माघार घेतली. त्यामुळे त्यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांचीही बिनविरोध निवड झाली.
सोमवारी (दि. ३) रोजी सर्व उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक संभाजी निकम, सहायक निवडणूक अधिकारी संतोष बीडवई, वैभव मोरडे हे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. १४ नोव्हेंबरला मतदान होणार असून लगेच दोन दिवसांनी म्हणजे १६ नोव्हेंबरला मतमोजणी होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.