Girish Mahajan: अमित शहांचा शब्द गिरीश महाजनांनी पाळला! स्थानिक आमदाराचा विरोध डावलून दिला विरोधकांना प्रवेश!

Nitin Ladha and Jayshree Mahajan quit Thackeray Sena to join BJP:जळगाव महापालिकेत मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपचे आमदार राजू भोळे यांच्या विरोधात समांतर सत्ता केंद्र स्थापन केले आहे.
Nitin Ladha and Jayshree Mahajan quit Thackeray Sena to join BJP
Nitin Ladha and Jayshree Mahajan quit Thackeray Sena to join BJPSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon BJP News: स्थानिक आमदारांचा विरोध डावलून प्रतिस्पर्ध्यांना भाजप प्रवेश दिला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची ही खेळी नाशिकमध्ये झाली. त्याची पुनरावृत्ती त्यांनी जळगावमध्ये केली.

शिवसेना ठाकरे पक्षाचे नितीन लढा आणि जयश्री महाजन या दोन माजी महापौरांचा भाजप प्रवेश झाला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सूचना त्यांनी तंतोतंत अमलात आणली.

दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्ष कार्यालयाचे भूमिपूजन झाले. यावेळी अमित शाह यांनी लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातील डोळ्यापुढे ठेवल्या. दूर दूर पर्यंत भाजपला कोणीही विरोधक राहू नये, असे ते म्हणाले.

त्यांचे हे मत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तंतोतंत अमलात आणले. नितीन लढा, जयश्री महाजन या दोन माजी महापौरांसह विरोधी पक्षनेते सुनील महाजन, प्रशांत नाईक, नितीन बर्डे यांचा भाजप प्रवेश केला. स्थानिक आमदार राजूमामा भोळे यांचा प्रचंड विरोध डावलून हे घडले.

Nitin Ladha and Jayshree Mahajan quit Thackeray Sena to join BJP
Maharashtra Politics: अस्वस्थ नेत्यांची राजकीय धुळवड; ऐन दिवाळीत महाशिमगा

जळगाव महापालिकेत सत्ता आणण्यासाठी त्यांचा हा डाव आहे. त्यासाठी आमदार भोळे यांनी वरिष्ठ नेत्यांकडे केलेली शिष्टाई बाजूला पडली. विरोधकांकडे प्रबळ उमेदवारच राहू नये हा महाजन यांचा डाव आहे.

नाशिक शहरात वादग्रस्त आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्याशी संबंध असल्याचा आरोप शिवसेनेच्या सुधाकर बडगुजर यांच्यावर होता. हा आरोप आणि फोटो भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत झळकवला होता. स्थानिक आमदार सीमा हिरे यांचा प्रचंड विरोध असतानाही मंत्री महाजन यांनी मात्र बडगुजर यांना वाजत गाजत प्रवेश दिला.

नाशिकच्या याच प्रयोगाची जळगावमध्ये महाजन यांनी पुनरावृत्ती केली. नाशिकमध्ये आमदार हिरे यांना पक्षांतर्गत विरोधक निर्माण झाला. जळगाव महापालिकेत आमदार राजू मामा भोळे यांच्या विरोधात समांतर सत्ता केंद्र निर्माण केले.

जळगाव महापालिकेत झालेला हा प्रवेश पक्षातील अनेकांना पसंत पडलेला नाही. भाजपला स्वतःच्याच क्षमतेवर आणि नेत्यांवर भरोसा नाय का? अशी चर्चा या निमित्ताने आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत अशाच नाराजीतून अतिशय नवख्या उमेदवारांनी भाजपच्या दिग्गजांना पराभूत केले होते. हे सर्व कार्यकर्त्यांच्या चर्चेत आहे.

जळगाव महापालिकेत सत्ता कोणताही पक्ष आणि गट याची असली तरी ठराविक नेतेच सर्व कारभार हातात. यामध्ये नितीन लढा, सुनील महाजन, कैलास सोनवणे, ललित कोल्हे यांचा समावेश आहे. त्यांना महाजन यांनी प्रवेशासाठी रेड कार्पेट अंथरले. भाजपला सत्ता किती महत्त्वाची आहे, हा संदेश त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना दिला आहे.

यानिमित्ताने आमदार राजू भोळे यांना कितीही राग आला तरी महाजन यांचे निर्णय बदलण्याची त्यांची क्षमता नाही, हा संदेश देखील गेला. या निमित्ताने जळगाव भाजपमध्ये सबकुछ मंत्री महाजन यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com