Nashik fake currency racket : नाशिकमध्ये बनावट नोटांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. नोटा छापण्याची पद्धत पाहून पोलिसही चक्रावले आहेत. नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवर बनावट नोटा छापणारे एक मोठे रॅकेट नाशिक ग्रामीण आणि शहर पोलीस दलाने संयुक्तिक कारवाई करत उद्ध्वस्त केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वर रोडवरील तळेगाव येथील एका खासगी बंगल्यात हा अनधिकृत कारखाना सुरू होता. कारवाईत पोलिसांनी लाखोंच्या बनावट नोटा जप्त केल्या असून पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे. तसेच नोटा छापण्यासाठी वापरले जाणारे केमिकल, प्रिंटिंग साहित्य जप्त करण्यात आलं आहे. नाशिक ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.
या कारखान्यात अत्यंत वेगळ्या क्लृप्तीचा वापर करून बनावट नोटा छापल्या जात होत्या. खऱ्या चलनी नोटा एका विशिष्ट केमिकलमध्ये बुडवून, त्या नोटांची शाई दुसऱ्या कागदावर वटवून हुबेहूब दिसणाऱ्या बनावट नोटा तयार केल्या जात होत्या. नोटा छापण्याची ही पद्धत पाहून पोलिसांनाही धक्का बसला.
आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, संशयित आरोपी 10 लाख रुपयांच्या खऱ्या चलनी नोटांच्या बदल्यात 30 लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवून व्यवहार करत होते. असाच एक व्यवहार सुरू असताना पोलिसांनी सापळा रचून पोलिसांनी धाड टाकत संशयितांना अटक केली.
पोलिसांनी याप्रकरणात अमरेश्वर आईथा (तेलंगणा), दासरी सत्यइ (तेलंगणा), गोकुळ दाते (तळेगाव, नाशिक), हिरामण दाते (तळेगाव, नाशिक), मच्छिंद्र घनदाट (सातपूर, नाशिक) अशा पाच जणांना अटक केली आहे. या कारवाईमुळे नाशिकसह तेलंगणा राज्यापर्यंत पसरलेल्या मोठ्या रॅकेटचे धागेदोरे समोर आले आहेत. हे बनावट नोटा झापणारे रॅकेट फक्त राज्यातच नाही तर देशभरात सुरू असल्याचा संशय असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. पोलिसांकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.