Shalarth ID Scam : 160 कोटींच्या शालार्थ घोटाळ्यातील शिक्षणाधिकारी फरार ; शासनाचा निलंबनाचा दणका, पथक मागावर!

Nitin Bachhav suspended by Maharashtra government : शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात नाशिक जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांना शासनाने निलंबित केलं आहे.
Nitin Bachhav suspended
Nitin Bachhav suspended Sarkarnama
Published on
Updated on

Shalarth ID scam Nashik : शालार्थ आयडी घोटाळ्यातील संशयित आरोपी तथा नाशिक जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांना शासनाने निलंबित केलं आहे. शालार्थ आयडी घोटाळ्यात संशय तसेच गडचिरोली येथे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर कर्तव्यावर नियमित हजर न राहणे या कारणांमुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

शालार्थ आयडी घोटाळ्याच्या माध्यमातून शासनाची १६० कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. नाशिक पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून या घोटाळ्याचा तपास सुरु असतानाच बच्छाव यांच्या निलंबनाचे आदेश निघाल्याने शैक्षणिक व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने बच्छाव यांना निलंबित केले आहे. सध्या ते फरार असून, नाशिक पोलिस आयुक्तालयाचे विशेष तपास पथक त्यांचा शोध घेत आहे.

शालार्थ आयडी घोटाळ्यासंदर्भात बच्छाव यांच्याविरुद्ध नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यांचा सहभाग समोर आल्यानंतर ते फरार झाले असून विशेष तपास पथकाकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. बच्छाव यांच्याविरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई प्रस्तावित असून, त्यांच्या कामकाजाची विभागीय चौकशी करण्याचे आदेशही शासनाने दिले आहेत. गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या वस्तुस्थिती अहवालानंतर कारवाईची प्रक्रिया पुढे सरकली.

Nitin Bachhav suspended
Shalarth ID Scam: धक्कादायक! कोट्यवधींच्या शालार्थ आयडी घोटाळ्यात पोलीस ठाण्यातच पुरावे केले नष्ट; आरोपपत्रात मुख्याध्यापक, संस्थाचालकांवर गंभीर आरोप

नाशिक ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासातील बाबी तसेच कार्यालयात विनापरवानगी गैरहजर राहिल्याचा आरोप या सर्व बाबींचा विचार करून शासनाने बच्छाव यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. १३ मार्च २०२६ रोजी गडचिरोली कार्यालयात हजर झाल्यानंतर बच्छाव यांनी कोणताही रजा अर्ज न देता पुन्हा गैरहजेरी लावल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ विनापरवानगी गैरहजर राहणे ही कर्तव्यविन्मुखता ठरत असल्याने विभागीय चौकशीची शिफारस करण्यात आली होती.

Nitin Bachhav suspended
Shalarth ID Scam : शिक्षण क्षेत्र हादरलं! 160 कोटींच्या घोटाळ्यात जळगावचा सर्वात मोठा सहभाग ; 849 शिक्षक, कर्मचारी रडारवर

आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी बच्छाव यांच्याविरुद्ध कारवाई करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाचा विचार केल्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियमांनुसार बच्छाव यांना शासन सेवेतून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. निलंबनाचा कालावधी सुरू असताना त्यांना शासनाच्या नियमानुसार निर्वाहभत्ता आणि परिभ्रमण भत्ता देण्यात येणार आहे. निलंबनाच्या काळातील पुढील कार्यवाही आयुक्त (शिक्षण), पुणे यांनी करावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

याशिवाय नाशिक ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या एका प्रकरणातही बच्छाव यांचा सहभाग असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात त्यांच्याविरुद्ध अभियोग दाखल करण्यासाठी शासनाची रवानगी मागण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com