Nashik Farmers News : कांदा निर्यातबंदीचा निर्णय भारतीय जनता पक्षाचा पिच्छा सोडायला तयार नाही. या कांदा निर्यातबंदीमुळे संकटात सापडलेले शेतकरी संतप्त आहेत. त्यामुळे त्यांनी केंद्र सरकारशी थेट पंगा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
येत्या १२ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय युवक संमेलन होत आहे. नाशिकला होणाऱ्या या शासकीय कार्यक्रमाच्या तयारीसाठी भारतीय जनता पक्षाने ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांची खास नियुक्ती केली आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाजन यांनी नुकतीच जिल्हा प्रशासनाची बैठक घेतली. अधिकाऱ्यांना विविध सूचना करून युवा महोत्सव यशस्वी होईल, असा दावा केला आहे.
दुसरीकडे, शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारविरोधात वातावरण आहे. त्यामुळे कांदा निर्यातबंदी तत्काळ हटवावी, यासाठी आंदोलन होत आहे. कांद्याच्या निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून द्यावे, मगच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जिल्ह्यात यावे, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाने दिला आहे.
नाशिकचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली चांदवड येथे कांदा निर्यातबंदी विरोधात शेतकऱ्याची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा निर्यातबंदीविरोधात शेतकऱ्याची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढत, थेट पंतप्रधान मोदी यांना इशारा दिला आहे. यावेळी निर्यातबंदीच्या निर्णयाच्याविरोधात संताप व्यक्त करण्यात आला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
टाळ, मृदंग, भजन गात शासकीय विश्रामगृह येथून ही अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर प्रांत कार्यालयाच्या प्रांगणात प्रतीकात्मक अंत्यसंस्कार करण्यात आले. केंद्र सरकारने निर्यातबंदी करून कांदा उत्पादकांवर अन्याय केला आहे. निर्यातबंदी केल्याने त्याविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष आहे. चांगल्या भावात कांदा विक्री होत असताना या निर्णयाने एका रात्रीत शेतकऱ्यांना कोट्यवधींचा फटका बसला. हा तोटा सरकारने त्वरित भरून द्यावा आणि कांदा निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
नायब तहसीलदार जे. एस. केदारे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रकाश चव्हाण, रेवन गांगुर्डे, चेतन गांगुर्डे, गोरख पारधी, भरत शेंडे, सतीश काळे, दीपक जाधव, सुखदेव गांगुर्डे, समाधान आहेर, विजय वाघ, सुभाष गोजरे, रामदास पवार आदींसह शेतकरी उपस्थित होते.
edited by sachin fulpagare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.