Nashik Political News : नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपचा धक्का...

Join BJP party : चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
Join BJP party
Join BJP partySarkarnama
Published on
Updated on

Nashik Political News : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीच्याअनुषंगाने सत्ताधारी पक्षांकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कुठे वजाबाकी, तर कुठे बेरीज झाल्याचे चित्र आहे. तशीच काहीशी परिस्थिती सध्या नाशिकच्या राजकारणात सुरू आहे. येथील उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला भाजपने धक्का देत खिंडार पाडण्यास सुरुवात केली आहे.

त्यातूनच ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी भाजप (BJP) च्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नाशिक (Nashik) कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबई येथे भाजप कार्यालय वसंतस्मृती येथे राज्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, नाशिक महानगराध्यक्ष प्रशांत जाधव, देवयानी फरांदे यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला असल्याची माहिती पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी दिली.

Join BJP party
Maharashtra Politics : ग्रामीण भागात 'मतपेरणी'साठी भाजपचं नवं 'कौशल्य'...

यावेळी उद्धव ठाकरे शिवसेना भारतीय विद्यार्थी माजी महानगर उपप्रमुख अमित शिंदे यांच्या नेतृत्वात पराग अहिरे, सुमित शिंदे, राहुल कालेकर, संदीप जैन, निखिल इंगळे, ज्ञानेश्वर दाभाडे, दीपक वाघ, सिद्धार्थ सोनवणे, कृष्णा कानडे, डॉ. अजिंक्य गांगुर्डे, जयशंकर जाधव, अतुल रौदळ, अमित इंगळे, जीतेश कालेकर, संदीप देवकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला.

नजीकच्या काळात ठाकरेंच्या शिवसेनेतील मोठे नेते भाजप प्रवेशाच्या प्रतीक्षेत असून योग्य वेळी या नेत्याचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती नाशिक महानगराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी दिली. ते म्हणाले, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश विकासाच्या दिशेने गरुडझेप घेत आहे. तसेच देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांसारख्या मातब्बर नेत्यांचे नेतृत्व महाराष्ट्राला लाभलेले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या विकासामुळे असंख्य कार्यकर्त्यांना एक विश्वास निर्माण झाला आहे, की भारतीय जनता पार्टीच्या विविध विकासकामांमुळेच देश 'न भूतो न भविष्यती' अशा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. म्हणूनच या असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपप्रवेश म्हणजे मोदींच्या विकास कार्यक्रमांवर व फडणवीस, बावनकुळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत कार्यकर्ते व पदाधिकारी विविध पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याबाबत केंद्रीयमंत्री डॉ. भारती पवार, गिरीश महाजन, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील, विभाग संघटनमंत्री रवी अनासपुरे, राहुल ढिकले, सीमा हिरे, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, प्रदीप पेशकार, गोविंद बोरसे, बाळासाहेब सानप, विजय साने, सतीश कुलकर्णी यांच्या विशेष मार्गदर्शनाने आणि भाजप नाशिक शहर सरचिटणीस काशिनाथ शिलेदार, सुनील केदार, ॲड. श्याम बडोदे, हिमगौरी आडके, रोहिणी वानखेडे, शहरातील पदाधिकारी, मंडलाध्यक्ष, विविध आघाड्या, प्रकोष्ठ अध्यक्ष यांनी स्वागत केले.

(Edited by Amol sutar)

Join BJP party
BJP News : निवडणूक अन् राम मंदिराबाबत भाजपची रणनीती ठरणार; अमित शाह, नड्डा घेणार बैठक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com