Tukaram-Mundhe-FDA Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Tukaram Mundhe: सिन्नर हादरले; दूध केंद्रांवर भल्या पहाटे ‘एफडीए’चे छापे, भेसळीच्या साहित्याचा दिवसभर वस्त्यांवर जाऊन शोध!

Nashik FDA raids Tukaram Mundhe Milk Center in Sinnar, adulterated materials seized-सिन्नरला अन्न व औषध प्रशासनाने चार दूध केंद्रांवर एकाच वेळी अधिकाऱ्यांच्या पथकाचे भल्या पहाटे छापे

Sampat Devgire

Sinnar Milk Center News: सत्ताधारी पक्षाच्या राजकीय नेत्यांशी संबंधित दूध केंद्रांचा विस्तार सिन्नरला मोठ्या प्रमाणावर आहे. दूध संकलनाविषयी तक्रारी होत्या. या पार्श्वभूमीवर थेट अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे तक्रारी झाल्या. 

सिन्नर तालुक्यात दूध भेसळीच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने शनिवारी छापे घातले. शहा येथील दोन केंद्रांवर भल्या पहाटे तपासणी करण्यात आली. कारवाडी आणि विघ्नवाडी या केंद्रांवरही छापे टाकण्यात आले. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. 

सिन्नर तालुक्यात दूध प्रक्रिया केंद्रांसाठी मोठ्या प्रमाणावर संकलन केले जाते. विविध गावांमध्ये दूध संकलन केंद्र आहेत. शहा येथील दोन दूध केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असल्याच्या तक्रारी होत्या. 

या पार्श्वभूमीवर थेट आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे भाऊसाहेब बैरागी व अन्य नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर शनिवारी मोठी कारवाई झाली. या कारवाईसाठी 12 अधिकाऱ्यांच्या पथकाने लगतच्या पोलीस ठाण्यांचा बंदोबस्त ही मागविला होता. 

प्रारंभी सकाळी या दूध केंद्रांची रेखी करण्यात आली. अशाप्रकारे भेसळ केली जाते याचा गोपनीय पद्धतीने मागवा घेण्यात आला. त्यानंतर एकाच वेळी चार केंद्रांवर तपासणी करण्यात आली. 

तपासणीत एका वाहनांमध्ये दूध भेसळीचे साहित्य असल्याचे आढळले. साहित्य जप्त करताना दूध केंद्राच्या संचालकांच्या कुटुंबातील महिलांनी पथकाला विरोध केला. मात्र या विरोधाला न जुमानता कारवाई झाली. त्यानंतर दिवसभर गावाच्या परिसरातील वस्त्यांवर लढवलेले भेसळीचे साहित्य शोधण्याचे काम सुरू होते. रात्री उशिरापर्यंत पथकाने भेसळीचे साहित्य जप्त केले. मोठ्या प्रमाणावर भेसळीचे साहित्य आढळल्याने पथकालाही धक्का बसला. 

भाऊसाहेब बैरागी या सामाजिक कार्यकर्त्यांनी भेसळीचा पाठपुरावा सातत्याने केला होता. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी संकलित होणारे दूध आणि ग्रामपंचायतीत दूध उत्पादन करणारे शेतकरी यांचे रेकॉर्ड जतन करण्याचे आदेश दिले होते. ग्रामपंचायतचे रेकॉर्ड आणि प्रत्यक्ष संकलित होणारे दूध याचा ताळमेळ बसत नव्हता. ही कारवाई झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. 

दूध संकलन केंद्र आणि प्रक्रिया केंद्रात माजीमंत्रांसह विविध राजकीय नेत्यांचा थेट संबंध आहे. दूध संघाच्या राजकारणात प्रभाव असलेल्या राजकीय नेत्यांचे धाबे या कारवाईने दबना आणले आहे. कारवाईनंतर दूध संकलन केंद्र संचालकांनी काही राजकीय नेत्यांकडे मदत मागितल्याचे कळते. 

रात्री उशिरापर्यंत दूध भेसळीचा तपास आणि चौकशी सुरू होती. सिन्नर तालुक्यात दूध देसाई विरोधात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जाते. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिवसभर गावात ठिय्या दिला होता. थेट आयुक्त मुंढे यांच्या कार्यालयातून त्याबाबत सूचना होत्या. त्यामुळे या कारवाईने खळबळ उडाली आहे. 

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT