Maharashtra gutkha transport crackdown update: महाराष्ट्रात गुटखा विक्रीला बंदी आहे. मात्र त्यातून पळवाटा काढून मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री करणारी लॉबी कार्यरत आहे. यामध्ये कोट्यावधी रुपयांचा व्यवहार करणारे गुटखा माफिया सक्रिय आहेत.
नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात गुटखा करणाऱ्या गाड्या पकडण्याच्या बातम्या नियमित असतात. मात्र पकडल्या जाणाऱ्या गुटख्यापेक्षा मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याचे प्रशासनाचे मत आहे. त्यासाठी मोठी यंत्रणा कार्यरत असल्याचे उघड झाले आहे.
सध्या सध्या प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे अण्णाभाऊ शेठ प्रशासनाची जबाबदारी आली आहे. नरहरी झिरवाळ हे या खात्याचे मंत्री आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
सध्या नियमितपणे प्रशासनाकडून तपासणीचे काम सुरू आहे. विविध ठिकाणी धाडी घातल्या जात आहेत. त्यामुळे भेसळ आणि गुटखा विक्रीवर नियंत्रण आल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्र राज्यात गुटखा विक्रीला बंदी आहे. मात्र लगतच्या मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यात गुटखा विक्री सुरू आहे. महाराष्ट्र ही मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अवैध गुटखा विक्रीसाठी गुजरात मधील मोठी लॉबी सक्रिय आहे.
गुजरात राज्यात महाराष्ट्राच्या सीमेवर गुटखा तयार करणारे कारखाने आहेत. या कारखान्यातून मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात गुटखा अवैध पद्धतीने पाठविला जातो. सीमेवरील तपास नाक्यांवर यंत्रणा त्याकडे कानाडोळा करत असते.
सध्या मात्र अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आहे. गुटखा विक्री बाबत मंत्री झिरवाळ गंभीर असून त्यांनी विक्रेत्यांवर मोका लावण्यात यावा अशी शिफारस केली आहे. त्यामुळे गुटखा माफीयांचे धाबे दणाणले आहे. विशेषता नंदुरबार, धुळे, नाशिक आणि लगतच्या जिल्ह्यात सहज होणारे गुटख्याची वाहतूक आता ठप्प झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.