Tukaram Mundhe MCOCA action : गुटखा सिंडिकेटवर ‘मकोका’चा फास; FDA आयुक्त तुकाराम मुंढे आक्रमक

MCOCA Action Alert in Maharashtra: FDA Targets Gutkha Mafia Networks : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील गुटखामाफियांना थेट लक्ष्य करत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाईचे आदेश दिले आहेत.
Tukaram Mundhe MCOCA action
Tukaram Mundhe MCOCA actionSarkarnama
Published on
Updated on

FDA Maharashtra gutkha raid : महाराष्ट्रात बेकायदेशीर गुटखा व्यवसाय करणाऱ्या टोळ्यांविरोधात आता मोठी आणि कठोर कारवाई होण्याचे संकेत मिळाले आहेत.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील गुटखामाफियांना थेट लक्ष्य करत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यभरातील गुटखा रॅकेटमध्ये खळबळ उडाली आहे.

भेसळमाफियांविरोधात कारवाई सुरू असतानाच आता गुटखामाफियाही तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या रडारवर आले आहेत. यासंदर्भात त्यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देत गुटखा सिंडिकेटची माहिती गोळा करण्याचे आदेश दिले आहेत. क्षेत्रीय सहआयुक्त (अन्न) आणि अन्न सुरक्षा निरीक्षकांनी संशयित टोळ्यांची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

मुंबईसह (Mumbai) राज्यातील अनेक भागांत सातत्याने गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांवर छापेमारी केली जात असली, तरी या संपूर्ण अवैध व्यवसायामागील मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचणे कठीण ठरत होते. मात्र आता केवळ किरकोळ विक्रेत्यांवर नाही, तर उत्पादक, पुरवठादार, वाहतूकदार, गोदामचालक, वित्तपुरवठादार आणि संपूर्ण वितरण साखळी तपासाच्या कक्षेत आणली जाणार आहे.

Tukaram Mundhe MCOCA action
Tukaram Mundhe Raid: तुकाराम मुंढेंचा भेसळमाफियांवर प्रहार सुरूच! राज्यभर 30 ठिकाणी छापे; 21 जण अटकेत, 17 आस्थापना सील

‘एफडीए’च्या प्राथमिक माहितीनुसार, अनेक गुटखा रॅकेट बनावट कागदपत्रे, डमी कंपन्या, बेनामी व्यवहार, गुप्त गोदामे आणि आंतरराज्य पुरवठा साखळीच्या माध्यमातून चालवले जात आहेत. त्यामुळे हा केवळ अन्नसुरक्षा नियमांचा भंग नसून संघटित गुन्हेगारीचे स्वरूप धारण करत असल्याचे प्रशासनाचे मत आहे.

Tukaram Mundhe MCOCA action
Tukaram Mundhe FDA Action : तुकाराम मुंढेंच्या धडाकेबाजपणानं शिर्डीतील भेसळमाफिया धास्तावले! साईंच्या नावावर विकले जाणारे ‘चिरंजीव पेढे’ रडारवर

राज्यात गुटखा, तंबाखू किंवा निकोटीनयुक्त पानमसाल्यासारख्या प्रतिबंधित पदार्थांच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत आधीच बंदी आहे. तरीही अशा पदार्थांची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याचे समोर येत असल्याने प्रशासनाने आता कठोर भूमिका घेतली आहे.

तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 नुसार दोन किंवा अधिक व्यक्ती आर्थिक फायद्यासाठी संघटित पद्धतीने बेकायदेशीर व्यवसाय करत असतील, तर त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल. यामुळे राज्यातील मोठ्या गुटखा सिंडिकेटवर थेट गुन्हे दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यस्तरावर रेकाॅर्ड तयार होणार

याशिवाय सर्व सहआयुक्त (अन्न) आणि अन्न सुरक्षा निरीक्षकांना जिल्हानिहाय मकोका पात्रता, एफआयआर, आरोपपत्र, न्यायालयीन आदेश, जप्ती, तपासाची स्थिती आणि अंतिम निकाल यांची स्वतंत्र नोंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यस्तरावर मुख्यालयात यासाठी स्वतंत्र नोंदवही तयार केली जाणार असून दरमहा आयुक्तांकडे अहवाल सादर केला जाणार आहे.

गुटखामाफियांमध्ये भीतीचे वातावरण

तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, कायद्याचे पालन करणाऱ्या व्यापाऱ्यांना कोणताही त्रास दिला जाणार नाही. मात्र सार्वजनिक आरोग्य धोक्यात घालून संघटित पद्धतीने प्रतिबंधित अन्नपदार्थांचा व्यापार करणाऱ्यांवर कायदेशीरदृष्ट्या अत्यंत कठोर कारवाई केली जाईल. त्यामुळे राज्यातील गुटखामाफियांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com