Seized Prohibited Tobbacco  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Narahari Zirwal Politics: दिंडोरीतील ९ कोटींच्या प्रतिबंधित तंबाखू कारवाईमागे ‘ती’ धक्कादायक लिंक, थेट मंत्रालयातूनच हलली सुत्रे!

Nashik Food and Drug Department takes major action, Minister Narhari Zirwal banned tobacco production reid in minister's constituency-अन्न व औषध प्रशासन मत्री नरहरी झिरवाळ यांच्या त्या निर्णयाने पर्यायी गुटखा असलेल्या सुगंधी तंबाखू उत्पादकांना असाही दणका

Sampat Devgire

Nashik News: राज्यात गुटखा आणि प्रक्रियायुक्त तंबाखू निर्मितीवर प्रतिबंध आहे. मात्र यामागे मोठे प्रभावशाली रॅकेट कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्र्याच्या मतदारसंघातच हा प्रकार सुरू होता.

नाशिक येथे अन्न व औषध प्रशासनाच्या विभागाच्या विशेष पथकाने मोठी कारवाई केली आहे. यामध्ये प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि गुटखा सदृश्य उत्पादने जप्त करण्यात आली. या कारवाईत नऊ कोटीचा प्रतिबंधित तंबाखू व गुटखा आढळून आला.

या प्रकरणामागे एक लिंक कार्यरत असल्याचे पुढे आले आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री नरहरी झिरवाळ यांनी गुटका आणि प्रक्रियायुक्त तंबाखू विरोधात मोठी घोषणा केली होती. यासंदर्भात गुटखा विक्रेत्यांवर मोका लावण्याचा प्रस्ताव त्यांनी तयार केला होता. त्यामुळे त्यांचे सगळीकडे कौतुक होत होते.

या संदर्भात दोन दिवसांपूर्वी गोंदे (इगतपुरी) येथील एका कारखान्यात मंत्रालयातील पथकाने छापा टाकला होता. त्यात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू उत्पादने आढळली. त्यातील पॅकेटवर दिंडोरी येथील कंपनीचे नाव होते. त्यातून दिंडोरीचा प्रकार उघड झाला.

या प्रकरणात पूर्वी राज्यबाहेरील प्रभावशाली घटक कार्यरत होते. राज्याच्या सीमेवरील शहरांतील कारवाईत गुटखा तसेच प्रतिबंधित सुगंधी तंबाखू उत्पादने आढळली. त्यावर कारवाई होत होती. त्यातूनच काही मंडळीनी थेट राज्यातच हे उत्पादन सुरू करण्याचे धाडस केले होते.

गुजरात आणि मध्य प्रदेश यामध्ये प्रमुख आहे. त्याचा सुगावा लागल्यावर संबंधित प्रकरणातील दोषींवर मोक्का कारवाईचा प्रस्ताव मंत्री झिरवाळ यांनी पुढे आणला. त्याला मुख्यमंत्र्यांनी विधीमंडळाच घोषणा करीत चालना दिली.

मंत्री झिरवाळ हे यासंदर्भात आक्रमक आहेत. मात्र त्यांच्या मतदारसंघातील एका कारखान्यातच असे उत्पादन सुरू असल्याचे आढळून आले आहे. यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या कारवाईत हा प्रकार उघडकीस आला.

दिंडोरी येथील तळेगाव औद्योगिक वसाहतीत इलाईट क्राऊन इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीत असे उत्पादन सुरू असल्याचे आढळले. यासंदर्भात गुन्हा झाला. बिपिन शर्मा, एडवर्ड नीचे बोरगोइंन, सुशांत कुमार पांडा, व्यंकट रमेश पेनुमाक, दयानंद रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंपनीतून ९ कोटी रुपयांचे साहित्य व प्रतिबंधित तंबाखू आणि गुटखास दृश्य पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्रात गुटखा व प्रक्रियायुक्त सुगंधी तंबाखू वर बंदी आहे. मात्र या व्यापारातील अनेक मंडळी प्रशासनाला हाताशी धरून राजरोसपणे हा व्यवसाय चालवीत आहेत. गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यात गुटख्याला बंदी नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या सीमेवरच काही कारखाने उभारण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्यावर प्रतिबंध करण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे.

--------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT