Nashik NMC Election News: नाशिक महापालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. रोज विविध पक्षांच्या नेत्यांच्या सभा होत आहे. प्रत्येक सभेत पैशांच्या वाटपाचे आरोप होत आहेत.
दोन दिवसांपूर्वी शिवसेना आणि मनसेची संयुक्त सभा गोल्फ क्लब मैदानावर झाली. त्या सभेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही झाडाझडती घेतली.
शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली. या सभेतही मंत्री गुलाबराव पाटील आणि दादा भुसे यांनी पैशाचा महापूर येईल असा दावा केला. उद्धव ठाकरे आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे दोघेही निवडणुकीत पैशांचा गैरवापर होत असल्याचा आरोप करीत आहेत.
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी यासंदर्भात नाव न घेता अनेक आरोप केले. पैशाने राजकारण फिरवतील मात्र आपण फिरायचं नाही. तिळगुळ घ्या पण बटन धनुष्यबाणाचेच दाबा, असे आवाहन त्यांनी केले.
सभेत शिक्षणमंत्री दादा भुसे यांनीही आता पैशाचा महापूर येईल. मात्र पैसा जनतेला विकत घेऊ शकत नाही. मतदानातून नाशिककर या निवडणुकीत ते दाखवून देतील, असा दावा केला.
एकच वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे मंत्रीही निवडणुकीत पैशाचा गैरवापर होत असल्याचा आरोप करीत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक दोघांच्याही तोंडी एकच आरोप आहे. त्यांचा अंगुली निर्देश नेमका कोणत्या नेत्याकडे आणि पक्षाकडे, यावरून कार्यकर्त्यांमध्ये मात्र गोंधळ आहे.
शहरातील नागरिकांमध्येही शहरातील नागरिकांमध्येही निवडणुकीत उमेदवारांकडून विविध फंडे वापरल्याचा आरोप होत आहे. ते मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असल्याचे उघडपणे बोलले जाते. या स्थितीत निवडणूक यंत्रणा आणि पोलीस यांच्यावर अविश्वास तर व्यक्त होत नाही ना. रोज आर्थिक गैरव्यवहारांची चर्चा होत असताना हे निवडणूक यंत्रणेला तर आव्हान नाही ना? याचीही चर्चा आहे.
आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शहरात जाहीर सभा होत आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री पंकजा मुंडे तसेच नाशिक महापालिका निवडणुकीचे सर्वेसर्वा गिरीश महाजन देखील या सभेला उपस्थित राहणार आहेत. या सभेत भाजप कोणाचा आणि कोणत्या मुद्द्यावर समाचार घेते याची आता उत्सुकता लागली आहे.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.