

Ahilyanagar Municipal Election : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत भाजप-अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस युती आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेला शेवटच्या टप्प्यात, युतीतून बाहेर काढले. यानंतर अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत ऐन थंडीत चांगलीच तापली. भाजप-अजित पवार राष्ट्रवादीच्या दडपशाही आणि दहशतीचे प्रकार निवडणुकीत वाढले आहेत. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
'शिवसेनेला दहशतीचे प्रकार नवीन नाहीत. आतापर्यंत 35 केस माझ्यावर दाखल आहेत. परंतु आता मंत्री झाल्यावर कसे आहे, ‘आगे गाडी पीछे गाडी बीच में गुलाबराव गडी’,' असा सूचक टोला मंत्री पाटील यांनी लगावला आहे.
अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ, सभा झाली. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप-अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस युतीवर जोरदार निशाणा साधला. अहिल्यानगरमध्ये अजित पवार राष्ट्रवादी-भाजपची युती असली, तरी इतर ठिकाणी भाजपकडून अजित पवार यांना त्रास देण्याचे काम सुरू आहे. ही युती म्हणजे, साप-मुंगस, अशी आहे, असा टोला देखील मंत्री पाटील यांनी लगावला.
गुलाबराव पाटील म्हणाले, "अहिल्यानगरमध्ये दडपशाही आणि दहशतीचे प्रकार सुरू आहेत. परंतु आम्हाला दाबू नका, आम्ही चेंडूसारखे आहोत. दादागिरीची भाषा आम्हाला शिकवू नका. अहिल्यानगर हा शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला आहे. अहिल्यानगर शहरासाठी 160 कोटींची पाणी योजना एकनाथ शिंदे यांनी मंजूर केली." त्यांनी लाडकी बहीण योजना सुरू करून, शिंदे यांनी लाडक्या बहिणींचा रुबाब वाढविला आहे. कितीही करा हल्ला, मजबूत आहे, शिवसेनेचा बालेकिल्ला, असेही गुलाबराव पाटील यांनी म्हटले.
अंबरनाथमध्ये भाजपने 'AIMIM'बरोबर केलेल्या युतीवरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी टीका केली. "'AIMIM'शी युती केली, काय प्रेम आहे. एकीकडे भगवा झेंडा आणि विचार सांगायचे, दुसरीकडे अभद्र युती करायची, हेच का तुमचे विचार आहेत?" असा सवाल करत पाटील यांनी करत भाजपची खिल्ली उडवली.
भाजप-अजित पवार राष्ट्रवादीकडून अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत सुरू असलेल्या दडपशाहीची, दहशतीवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केली. "गणपती असो की, दुर्गा देवीची मिरवणूक, मला लगेच तडीपारीची नोटीस येत होत होती. आतापर्यंत 35 केस माझ्यावर दाखल आहेत. परंतु आता मंत्री झाल्यावर कसे आहे, ‘आगे गाडी पीछे गाडी बीच में गुलाबराव गडी’, अशी मिश्किल टिप्पणी करताच, सभेत एकच हशा पिकला. ही सर्व किमया हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आहे," असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.