IPS Dattatrayx Karale .jpg Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maharashtra IPS Transfer: अशोक खरात 'कनेक्शन'चा फटका; व्हायरल फोटो अन् गंभीर आरोपानंतर नाशिकचे 'आयजी' दत्तात्रय कराळेंची बदली

Maharashtra Police News: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची धग थेट पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचली होती. पोलिस अधिकारी दत्तात्रय कराळे यांच्यावर गंभीर आरोप झाल्यामुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळाले होते.

Deepak Kulkarni

Nashik News: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात लैंगिक अत्याचार व फसवणूक प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. खरातशी जवळचे संबंध असल्याचे आरोप झाल्यानंतर राजकीय नेतेमंडळींसह प्रशासकीय अधिकारीही चांगलेच अडचणीत सापडले आहेत. अशातच खरात प्रकरणात गंभीर आरोप झालेले नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांची बदली करण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या गृहविभागानं शुक्रवारी (ता.13) तब्बल 52 आयपीएस पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. यात नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याही नावाचाही समावेश आहे. त्यांची राज्य मानवी हक्क आयोगाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची धग थेट पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचली होती. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी पोलिस अधिकारी दत्तात्रय कराळे यांच्यावर गंभीर आरोप करत या प्रकरणाला नवीन वळण दिले होते.

एकीकडे अशोक खरात प्रकरण तापलं असतानाच अंजली दमानिया यांनी दुसरीकडे त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून व्हिडिओ आणि काही फोटो शेअर केले होते.त्यात धक्कादायक बाब म्हणजे IG दत्ता कराळे हेही अशोक खरातच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचे दिसून आलं होतं.

अंजली दमानिया यांनी त्यांच्या पोस्टमधून काही मुद्दे उपस्थित केले होते. त्यात त्या म्हणाल्या होत्या, दत्ता कराळे हे एक IG लेवलचे पोलीस अधिकारी असताना खरातांसारख्या बाबांच्या कार्यक्रमात का गेले? तेथे भाषण देखील दिले? हे जेव्हा सामान्य जनता ऐकते तेव्हा खरातांवर विश्वास का नाही बसणार? त्यांची देखील चौकशी departmental vigilance कडून झाली पाहिजे. त्यांचे देखील थोडे थोडके नाही तर तब्बल 18 कॉल आहेत. ह्याचे उत्तर पोलिस महासंचालक सदानंद दाते सरांनी घेतले पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली होती. यानंतर कराळे हे अडचणीत आल्याचं दिसून आलं होतं.

आयजी दत्तात्रय कराळे यांचं नाव समोर आल्यानं एकच खळबळ उडाली होती. यानंतर खरात आणि नाशिक पोलिस IG कराळे यांच्यातील नेमक्या संबंधांवरुन तर्क वितर्कांना उधाण आलं होतं. आता कराळे यांची बदली झाल्यानं कुठेतरी अशोक खरात कनेक्शनचा फटका त्यांना बसल्याचं बोललं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT