Nashik Municipal Corporation Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Income Tax Raid : नाशिकमध्ये बिल्डर, कंत्राटदारांवर छापे

Sampat Devgire

Nashik Political News :

नाशिककरांची आजची सकाळ उजाडली ती इन्कमटॅक्सच्या छापेसत्राच्या बातमीने. नाशिक शहरातील महापालिकेच्या कंत्राटदारावर आज सकाळी इन्कमटॅक्स विभागाने छापे टाकले. यात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांशी सलगी असलेल्या महापालिकेच्या एका मोठ्या कंत्राटदाराचा समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विविध केंद्रीय संस्थांकडून कारवाई केली जात आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक (Nashik) शहरात काही बांधकाम व्यावसायिक आणि महापालिकेच्या कंत्राटदारांवर आज सकाळी इन्कमटॅक्स विभागाने छापे (Income Tax Raid) टाकून तपासणी सुरू केली. एकूण 4 कंत्राटदार आणि 10 बिल्डर अशा 14 ठिकाणी इन्कमटॅक्सच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.

याबाबत इन्कमटॅक्स विभागाकडून अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. शहरातील हर्ष कन्स्ट्रक्शन आणि महापालिकेचे कंत्राटदार बी. टी. कडलक यांच्यासह तीन ठिकाणी इन्कमटॅक्स अधिकाऱ्यांनी सकाळी छापे टाकून तपासणी सुरू केली आहे.

याबाबत संबंधित संस्थांची कार्यालये आणि निवासस्थानांवर स्वतंत्रपणे चार पथकांकडून कारवाई सुरू असल्याची माहिती मिळत आहे. अतिशय बारीक-सारीक तपशील आणि विविध कागदपत्रांची छाननी करण्याचे काम सुरू असल्याने हे काम आणखी दोन दिवस सुरू राहील, असे सांगण्यात येते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या कंत्राटदाराने नुकतेच शिंदे गटातील (Eknath Shinde) विविध माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शासनाकडून मंजूर करून आणलेल्या कामांचे एकत्रीकरण करून ते काम आपल्याकडे घेतले होते. उपकंत्राटदारांमार्फत ते इतरांना वाटप केले जात होते. त्यात मोठा व्यवहार झाल्याचे कळते. यासंदर्भात विविध कंत्राटदारांनी तक्रारी केल्याचे कळते.

इन्कमटॅक्स विभागाने केलेल्या या कारवाईमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर आणि आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ही कारवाई झाल्याने त्याची राजकीय क्षेत्रातही या छापेसत्राची चर्चा आहे.

(Edited by Avinash Chandane)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT