Girish Mahajan | Kumbh Mela Fake Work Order Scam Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan : गिरीश महाजनांना आता नाशिकचे मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय, माजी मुख्यमंत्र्याचा नाशिकमध्ये येऊन हल्लाबोल

Prithviraj Chavan On Girish Mahajan : नाशिक दौऱ्यावर आलेल्या माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नाशिकचे पालकमंत्री तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली.

Ganesh Sonawane

Nashik Kumbh Mela : नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारकडून 35 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीवरुन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेक प्रश्न उपस्थितीत केले. नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी यावर भाष्य करत कुंभमेळा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावरही टीका केली.

कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मागील वेळी सुमारे ४० लाख भाविक आले होते, तर यावेळी ६ कोटी भाविक येतील, असा सरकारचा दावा आहे मात्र, या अंदाजामागे शास्त्रीय अभ्यास झाला आहे का, हा प्रश्न आहे. गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री झाले आहेत मात्र, त्यांना आपण नाशिकचे मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटत आहे अशी टीका चव्हाण यांनी केली.

नाशिकमध्ये कुंभमेळा होत आहे. हिंदू धर्मातील पवित्र सण आहे. मी मुख्यमंत्री असतानाही कुंभमेळा झाला होता, त्याला मी काही निधी दिला होता. कारण सुख-सुविधा झाल्या पाहिजे. पंरतु यावेळी मी जे बघतोय ते अतिशय शॉकिंग आहे. गेल्यावेळी तीन -साडेतीन हजार कोटींचा खर्च झाला होता. यावेळी ३५ हजार कोटींचं बजेट काढलेलं आहे. हा खर्च मागील सर्व कुंभमेळ्यांच्या तुलनेत अनेक पटींनी अधिक असल्याने सरकारने यासंदर्भातील सविस्तर प्रोजेक्ट रिपोर्ट (डीपीआर) सार्वजनिक करावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली.

कुंभमेळा मंत्री म्हणून जी स्वतंत्र अशी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती कोणत्या मंत्रालयाच्या अधिकारात करण्यात आली आहे. तसेच त्यामागील प्रशासकीय प्रक्रिया काय होती, मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकारात हे नवीन मंत्रिपद तयार केलंय का याचाही खुलासा सरकारने करावा असही चव्हाण यांनी म्हटलं.

त्यांनी अनेक बंगले घेतले....

नाशिकमध्ये ६ कोटी लोक कुंभमेळ्यासाठी आले तर तेवढा भार झेपेल का, याचा विचार कोणी केलेला नाही. फक्त पैसे खाण्याचा व टेंडर काढण्याचा हा विषय आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले. नवीन पालकमंत्री नेमले आहेत, ते तर आता नाशिकचे मुख्यमंत्री झाल्यासारखं वागत आहे. त्यांनी बरेच बंगले वैगेरे घेतले आहेत असा निशाणा पृथ्वीराज चव्हाण यांनी नाव न घेता मंत्री गिरीश महाजन यांच्यावर लगावला.

या प्रकल्पासाठी स्वतंत्र कुंभमेळा मंत्री अशी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती कोणत्या मंत्रालयाच्या अधिकारात करण्यात आली आणि त्यामागील प्रशासकीय प्रक्रिया काय होती, याचाही खुलासा सरकारने करायला पाहिजे असं चव्हाण म्हणाले.

नाशिक कुंभमेळ्यासाठी मंजूर निधी हा नगरविकास विभागामार्फत खर्च केला जात नसून, त्या खात्याचे मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांची त्यात काहीही भूमिका दिसत नाही. त्यांना बाजूला ठेवण्यासाठीच गिरीश महाजन यांची विशेष मंत्री आणि त्यानंतर नाशिकचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचा आरोपही पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केला. कुंभमेळ्यासाठी निधी द्यावा याला आमचा विरोध नाही. मात्र जनतेच्या पैशाचा वापर पारदर्शक पद्धतीने झाला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अहवाल आणि खर्चाचा तपशील सार्वजनिक केल्याशिवाय निधी खर्च करू नये असही ते म्हणाले.

आमचा रस्ता चुकला.....

मी पहिल्यांदा समृद्धी महामार्गाने आलो, वाटलं लवकर येईन. पण समृद्धी महामार्गावर नाशिकमध्ये येण्यासाठी कोणत्याही पाट्या लावलेल्या नाहीत. त्यामुळे आमचा रस्ता चुकला, बरंच फिरावं लागलं. नाशिकसारख्या आधुनिक शहरात या गोष्टी झाल्या पाहिजेत. आज नाशिकमध्ये येताना खड्ड्यांचा अनुभवही घेतल्याचं ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT