Nashik Municipal Corporation Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यात नगरसेवकांची गैरसोय, विषय थेट महासभेत गाजणार?

Nashik Kumbh Mela flag-hoisting, Corporators Insult : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यात नगरसेवकांना अपेक्षित आसनव्यवस्था मिळाली नाही. त्यामुळे भर कार्यक्रमात मानापमान नाट्य रंगलं.

Ganesh Sonawane

Nashik Kumbh Mela, Corporators Insult : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यात महापालिकेच्या नगरसेवकांसाठी करण्यात आलेल्या आसनव्यवस्थेवरुन मानापमान नाट्य रंगलं.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यास राष्ट्रपती येणार असल्याने नाशिक महापालिकेतील १२२ नगरसेवकांना रामकुंडावर चांगली जागा मिळेली अशी अपेक्षा होती. परंतु, प्रत्यक्षात तसे घडले नाही. त्यांना अतिशय दूरवरील जागा मिळाली. यामुळे नगरसेवक नाराज झाल्याचे पाहायला मिळाले.

सोहळ्यात, महापालिकेच्या १२२ नगरसेवकांची गैरसोय झाली. काहींना पायऱ्यांवर बसून, तर काहींना उभे राहून ध्वजारोहण सोहळ्यात सहभागी व्हावे लागले. नगसेवकांच्या झालेल्या या अवहेलनेचे पडसाद आता मनपाच्या महासभेत उमटण्याची शक्यता आहे. नगरसेवकांकडून प्रशासनासह कुंभमेळा प्राधिकरणाला जाब विचारला जाण्याची शक्यता असून महासभेत हा विषय गाजण्याची शक्यता आहे.

कार्यक्रमात सत्ताधारी भाजपसह अन्य नगरसेवक संतापल्याचे पाहायला मिळाले. पूर्वसूचना देऊनही नगरसेवकांची व्यवस्था दूरवर करण्यात आल्याने त्यांनी कार्यक्रमात नाराजी व्यक्त केली. काहींकडे ओळखपत्र नसल्याने त्यांची अडवणूक झाली. इतक्या दूरवरून कार्यक्रम बघायचा असेल तर, तर आम्ही निघून जातो, असा इशारा काही नगरसेवकांनी दिला. दरम्यान महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी मध्यस्थी करत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी बोलून रामकुंडावरील गांधी स्मारकालगत व्हीव्हीआयपींसाठी असलेल्या ‘गौतमी’ आसन व्यवस्थेत नगरसेवकांना प्रवेश मिळवून दिला. परंतु, तिथेही काहींची महापालिकेचे ओळखपत्र नसल्याने अडवणूक झाली. तसेच खुर्च्याची संख्या कमी असल्याने काही नगरसेवकांना उभे राहूनच सोहळा पाहावा लागला.

तसेच शहराच्या प्रथम नागरिक म्हणून महापौर हिमगौरी आडके यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. मात्र ध्वजारोहणाच्या वेळी प्रोटोकॉलनुसार राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ सदस्यांना ध्वजस्तंभाजवळ स्थान होते. त्यामुळे महापौर यांना राष्ट्रपतींसोबत ध्वजस्तंभाजवळ उभे राहण्याची संधी मिळाली नाही. या संपूर्ण प्रकाराबाबत नियोजनात अधिक समन्वय हवा होता, अशी भावना नगरसेवकांनी व्यक्त केली आहे. याबाबत महासभेत चर्चा करून प्रशासनाकडे खुलासा मागण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

एकवेळ आपल्याला बसायला....

आगामी कुंभमेळ्याची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण करून झाली आहे. या कुंभमेळ्यात प्रथमच सर्व धार्मिक आखाडे एकत्र आले आहे. नरेंद्राचार्य महाराज यांचे अनुयायी मोठ्या संख्येने आले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींची बाहेरून येणाऱ्या सर्वांची व्यवस्था पहाणे कर्तव्य आहे. एकवेळ आपल्याला बसायला नाही मिळाले तरी चालेल पण बाहेरून आलेल्यांना बसायला मिळाले पाहिजे ही सर्व नाशिककर म्हणून आपली सर्वांची जबाबदारी आहे. सर्वांनी जबाबदारीने असे काम करणे व वागणे यापुढे अपेक्षित असल्याचं भाजप शहराध्यक्ष सुनिल केदार यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT