Jp Nadda, Devendra Fadnavis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Bjp News : नाशिकमध्ये लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार? इच्छुकाने घेतली नड्डांची भेट

Bjp Leader Anil Jadhav Meet Jp Nadda For Nashik Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी भाजप आग्रही असल्याचे चित्र आहे. आता महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ कोणाला मिळणार? याची उत्सुकता आहे...

Arvind Jadhav

Nashik Lok Sabha Election Politics News :

नाशिक लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळावा, यासाठी थेट दिल्लीत जोर लावला जातो आहे. हा मतदारसंघ भाजपला सुटणार, अशा चर्चा यामुळे वाढल्या आहेत. मतदारसंघाचा निकाल काहीही लागो. पण इच्छुकसुद्धा टाइट फिल्डिंग लावण्यावर भर देत आहेत.

भाजपचे इच्छुक उमेदवार अनिल जाधव यांच्यासाठी तर भीमराव आंबेडकर यांनीच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डाकडे शिफारस केली. नड्डा यांनीही याची नोंद घेत असल्याचे म्हटले. यामुळे Nashik Lok Sabha Constituency साठी तयारी करणाऱ्या जाधव यांचा आत्मविश्वास दुणावला आहे.

नाशिक लोकसभेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार याचे संकेत मिळू लागले आहेत. राज्यातील इतर जागांप्रमाणे भाजप नाशिकसाठी आक्रमक झाला आहे. ही जागा भाजपला मिळवायचीच असा चंग वरिष्ठ नेत्यांनी बांधला आहे. वरिष्ठ नेत्याच्या हालचालींनुसार इच्छुक उमेदवारांच्या संख्येतसुद्धा तशीच वाढ झाली आहे. त्यामुळे मला काम करण्यास सांगितलंय, असा दावा करीत उमेदवारीसाठी प्रत्येक उमेदवारांकडून तटबंदी मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातोय.

भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा मुंबईच्या दौऱ्यावर आल्याची संधी भाजप इच्छुक अनिल जाधव यांनी साधली. जे. पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार या कोअर कमिटीतील सदस्यांनी मुंबईतील राजगृह या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. या वेळी आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी सर्वांचे स्वागत केले. या शिष्टमंडळात उद्योजक आणि नाशिक लोकसभेचे भाजपचे इच्छुक अनिल जाधव यांचाही समावेश होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या वेळी भीमराव आंबेडकर यांनीच भाजप नेते अनिल जाधव यांची नड्डांकडे शिफारस करीत हा उमेदवार चांगला असल्याचे म्हटले. नड्डाजींनीही जाधव यांच्या उमेदवारीची पार्लेमेंटरी बोर्डांकडे नोंद करण्याची सूचना दिली. या बोर्डाचा अहवाल राज्य आणि पुढे केंद्रीय स्तरावर तपासूनच उमेदवारांचे नाव अंतिम करण्यात येते.

अनिल जाधव हे जवळपास 40 वर्षांपासून पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यांचे राज्यातील मोठ्या नेत्यांबरोबर चांगले संबंध आहेत. जाधव यांच्या दाव्यानुसार 2019 च्या निवडणुकीवेळी त्यांना नाशिक लोकसभा लढवण्यासाठी पक्षाकडून सांगण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी युती झाली अन् जाधव यांची संधी हुकली. या संधीची भरपाई या वेळी होईल, असा विश्वास जाधव यांना आहे.

भाजपकडून केदार आहेर, अ‍ॅड. नितीन ठाकरे, स्वामी कंठानंद, शांतीगिरी महाराज, दिनकर पाटील यांच्यासह अनके इच्छुक सरसावले आहेत. भाजपलाही एका उमेदवाराची निवड करताना नाकीनऊ येणार आहे. दरम्यान, नड्डा यांच्याकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर शिफारस झाल्याने जाधव यांचा विश्वासही कमालीचा वाढला आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT