MLA Devyani Pharande  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Lok Sabha Election 2024 : भाजप आमदार देवयानी फरांदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची !

Nashik Lok Sabha Election Voting : माजी आमदार गीते आणि आमदार फरांदे यांच्यात चांगलीच जुंपली. हा वाद वाढण्याची शक्यता होती. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. पोलीस आणि कार्यकर्त्यांनी त्यात हस्तक्षेप केला. शिवसेना कार्यकर्त्यांनी माजी आमदार गीते यांना येथून बाहेर काढले. त्यामुळे हा वाद टाळला. यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांनी मशाल, मशाल अशा जोरदार घोषणा दिल्याने देखील तणाव निर्माण झाला.

Sampat Devgire

Nashik Election News : नाशिक लोकसभा मतदार संघात मतदान सुरू आहे. शहरातील भद्रकाली मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर मतदार मतदानासाठी आले होते. यावेळी भाजप आणि शिवसेना यांच्या आजी-माजी आमदारांत चांगलीच जुंपली. नाशिक शहरात अतिशय वेगाने मतदान सुरू आहे. कडक उन्हामुळे मतदारांची चांगलीच तारांबळ उडत आहे.

नाशिक (Nashik) शहरातील भद्रकाली पोलीस ठाण्याच्या शेजारी असलेल्या महापालिका इमारतीत मतदानासाठी मोठी गर्दी झाली होती. हा मुस्लिम बहुल मतदारांचा परिसर आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर झालेल्या गर्दीने येथे आलेल्या भाजप आमदार देवयानी फरांदे या चौकशी करीत होत्या.मतदान झालेल्या नागरिकांची देखील येथे मोठी गर्दी होती. मतदानासाठी लांब रांगा देखील होत्या. त्यामुळे आमदार फरांदे यांनी येथील मतदारांना बाहेर जाण्यासाठी वाद घालण्यास सुरुवात केली. या सर्व प्रकारामुळे मतदानासाठी आलेले नागरिक आणि आमदार फरांदे यांच्यात देखील वाद झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हा वाद सुरू असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वसंत गीते तेथे आले. त्यांनी भाजप आमदारांना मतदारांना धमकावू नये,असे सांगितले. येथील मतदारांनीही तक्रारी केल्याने माजी महापौर विनायक पांडे हे देखील येथे दाखल झाले होते. यावेळी आमदार फरांदे आपले प्रतिस्पर्धी वसंत गीते यांच्यावर चांगल्याच भडकल्या. त्यांनी एकेरीवर येऊन 'हा परिसर म्हणजे तुमची जहागिरी आहे काय?' असे बोलून एकेरी भाषा वापरत त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली, असे कार्यकर्त्यांनी सांगितले.

या सर्व प्रकारामुळे माजी आमदार गीते आणि भाजप (BJP) आमदार फरांदे यांच्यात चांगलीच जुंपली. हा वाद अधिक वाढण्याची शक्यता होती. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. पोलीस आणि कार्यकर्त्यांनी यात वेळीच हस्तक्षेप केला. शिवसेना कार्यकर्त्यांनी माजी आमदार गीते यांना येथून बाहेर काढले.त्यामुळे हा वाद टाळला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी मशाल, मशाल अशा जोरदार घोषणा दिल्याने देखील तणाव निर्माण झाला होता. मात्र भद्रकाली बुथवर भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांत वादावादी झाल्याची चर्चा पसरली होती.

तो शहरभर चर्चेचा विषय ठरला

याबाबत आमदार फरांदे यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. माजी आमदार वसंत गीते यांनी आमदार फरांदे या मतदान प्रक्रियेत अडथळा आणत होत्या. त्यांनी काही मतदारांना मतदान केंद्रातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तो आम्ही थांबवल्याने त्यांनी अपशब्द वापरले असा आरोप केला. सध्या या मतदान केंद्रावर शांततेत मतदान सुरू आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT