Chhagan Bhujbal Latest News :'माझ्या नावाची चर्चा हा भूतकाळ, हेमंत गोडसे हेच आमचे उमेदवार'; छगन भुजबळ

Nashik Lok Sabha Election Constituency Latest Update : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या कुटुंबीयांसह आज सिडको येथील मतदान केंद्रात मतदान केले.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Nashik Constituency 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघात (Nashik Loksabha) गेल्या तीन निवडणुकींमध्ये भुजबळ यांच्या कुटुंबातील उमेदवार होता. यंदा पहिल्यांदा भुजबळ उमेदवार नाहीत. भुजबळांशिवाय होणारी ही लोकसभेची निवडणूक चर्चेचा विषय आहे.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपल्या कुटुंबीयांसह आज सिडको येथील मतदान केंद्रात मतदान केले. यावेळी भुजबळ यांनी रांगेत उभे राहून मतदान केले. मतदानानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

भुजबळ म्हणाले, नाशिक मतदारसंघातून (Nashik Constituency) 2009 मध्ये समीर भुजबळ हे विजयी झाले होते. त्यानंतर 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकीत आमच्या कुटुंबातील सदस्याने उमेदवारी केली होती. मात्र तेव्हा आम्ही विरोधी पक्षात होतो.

आमच्या विरोधातील उमेदवार विजयी झाले त्याचे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची लाट होती. आम्ही मात्र विरोधी पक्षात होतो त्यामुळे आमचा पराभव झाला. या माध्यमातून त्यांनी आपल्या पराभवाचे कारण देखील सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chhagan Bhujbal
Eknath Shinde Voting : एकनाथ शिंदेंनी कुटुंबियांसोबत बजावला मतदानाचा हक्क ! मतदान केल्यानंतर म्हणाले...

ते पुढे म्हणाले, मी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून इच्छुक होतो. मला उमेदवारी मिळाली नाही. हा भूतकाळ आहे. गेल्या तीन निवडणुकांमध्ये नाशिक मतदारसंघातून आमच्या कुटुंबातील सदस्य उमेदवार होता. मात्र यातील निवडणुका नंतर यंदाच्या निवडणुकीत देखील आमचा उमेदवार उभा आहे. त्याचे नाव हेमंत गोडसे आहे.

दिंडोरी मतदार संघात काही शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा घालून मतदानाला जाण्याचा प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी मतदान केंद्र प्रवेश दिला नाही. त्यामुळे तो वादाचा विषय झाला. या संदर्भात भुजबळ म्हणाले, कांद्याचा प्रश्न असेल आणि कांद्याच्या माळा घालून कोणाला त्याबाबत लक्ष वेध घ्यायचे असेल तर त्यासाठी आम्ही आहोत.

जे राजकारणी आहेत त्यांना ते दाखवा. राजकारणी आणि नेत्यांपुढे सत्याग्रह करा. मात्र कांद्याच्या माळा घालून मतदान केंद्रात काय साध्य होणार आहे. अधिकारी त्याबाबत काय करू शकतील. त्यामुळे या संदर्भात आंदोलन करणाऱ्यांनी हे वास्तव लक्षात घेतले पाहिजे. कांद्याच्या माळा घालून गेलो त्यामुळे मतदान करू शकलो नाही, असे करू नये. प्रत्येकाने मतदान करण्याचा आपला अधिकार बजवावा असे आवाहन देखील त्यांनी केले.

Chhagan Bhujbal
Shantigiri Maharaj Latest News : शांतिगिरी महाराजांनी मतदान यंत्राला घातला फुलांचा हार; गुन्हा दाखल होण्याची शक्यता

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com