Devayani Farande sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Devayani Farande News : मध्य नाशिकच्या आघाडीवर ठरणार आमदार फरांदे यांचे भवितव्य? वाढलेली मतदान टक्केवारी डोकेदुखी ठरणार...

Nashik Lok Sabha : आमदार फरांदे रोजच्या प्रचारात अपवादानेच दिसल्या. मात्र माजी आमदार गीते विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम समजून अतिशय सक्रिय होते. नाशिक मध्य मतदार संघात यंदा 57.15 टक्के मतदान झाले.

Sampat Devgire

Nashik Political News : नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि महाविकास आघाडीचे माजी आमदार राजाभाऊ वाजे हे उमेदवार आहेत. मात्र नाशिक मध्य मतदार संघात या उमेदवारांपेक्षा भाजपच्या आमदार फरांदे आणि शिवसेना Shivsena उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वसंत गीते हेच खरे उमेदवार आणि प्रतिस्पर्धी असल्यासारखे प्रचारात होते. या मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदार देवयानी फरांदे आहेत. त्यामुळे येथे महायुतीला आघाडी मिळणे भाजपच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा प्रश्न आहे.

आमदार फरांदे रोजच्या प्रचारात अपवादानेच दिसल्या. मात्र माजी आमदार गीते विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम समजून अतिशय सक्रिय होते. या दोन्ही आजी-माजी आमदारांत मतदानाच्या दिवशी भद्रकालीतील मतदान केंद्रावर झालेली बाचाबाची हा देखील त्यांच्या राजकीय इर्षेचाच भाग होता. त्यामुळे निवडणूक लोकसभेची असली तरीही आमदार फरांदे आणि माजी आमदार वसंत गिते यांच्यासाठी ती विधानसभेची निवडणूक असावी, असे दिसत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाशिक मध्य मतदार संघात यंदा 57.15 टक्के मतदान झाले. गत निवडणुकीच्या तुलनेत त्यात अल्पशी 1.28 टक्के वाढ आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत येथून फरांदे Devayani Farande यांना 73 हजार तर काँग्रेसच्या डॉक्टर हेमलता पाटील यांना ४५ हजार मते होती. मनसेचे माजी आमदार नितीन भोसले तिसऱ्या क्रमांकावर होते. लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेना युतीचे खासदार हेमंत गोडसे यांना 94 हजार 429 तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर भुजबळ यांना 56 हजार 459 मते मिळाली होती. थोडक्यात विधानसभा आणि लोकसभा दोन्ही निवडणुकांमध्ये महायुती येथे आघाडीवर होती. ही आघाडी टिकविणे भाजपसाठी BJP प्रतिष्ठेचा प्रश्न आहे.

यंदाच्या निवडणुकीत मध्य मतदारसंघात आमदार फरांदे यांसह भाजपचे विजय साने, सुरेश पाटील, अनिल भालेराव, शिंदे गटाचे अजय बोरस्ते यांसह विविध नेते आघाडीवर होते. या प्रचारात शिवसेना शिंदे गट प्रमुख होता त्यांच्याकडून गेल्या दहा वर्षात गोडसे यांनी केलेली विकास कामे, अयोध्येतील श्रीराम मंदिर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व हे मुद्दे होते.

महाविकास आघाडी कडून शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे, माजी आमदार वसंत गीते, सय्यद मुशिर, काँग्रेसचे शहर अध्यक्ष आकाश छाजेड, हनीफ बशीर, डॉ हेमलता पाटील, राहुल दिवे, गजानन शेलार आदी आघाडीच्या घटक पक्षांचे नेते प्रमुख होते. समाज माध्यमांवरील प्रचार, राज्यघटनेत बदल, महाराष्ट्रात भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये पाडलेली फुट यांसह तोडफोडीचे राजकारण याची मतदारांमध्ये विशेष चर्चा होती. त्यामुळे ही निवडणूक मतदारांनीच आपल्या हातात घेतल्याचे चित्र होते. त्यामुळे अनेक मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदान संपेपर्यंत रांगा दिसून आल्या. मतदानासाठी झालेली गर्दी भारतीय जनता पक्ष आणि केंद्रातील सरकार विरोधातील असंतोष व्यक्त करण्यासाठी होती, असा दावा शिवसेना ठाकरे गटाने केला आहे.

यंदाच्या निवडणुकीत नाशिक मध्य मतदारसंघ शहरातील मतदानावर मोठा प्रभाव टाकील, अशी स्थिती आहे. अल्पसंख्यांक, मागासवर्गीय मतदारांचा कल प्रामुख्याने महायुती विरोधात असल्याचे बोलले जाते. त्या तुलनेत ओबीसी समाज महायुतीकडे झुकला होता. त्यामुळे नाशिक मध्य मतदार संघात महायुतीला गेल्या दोन निवडणुकांमध्ये कल अर्थात आघाडी टिकवून ठेवणे आव्हानात्मक आहे. या आघाडीचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी आणि मतदानाचा कल दोन्हींवर प्रभाव टाकणारा ठरणार आहे.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT