Mumbai News, 26 May : भिवंडी लोकसभा मतदारसंघातून ( Bhiwandi Lok Sabha Constituncy ) तिसऱ्यांदा कपिल पाटील रिंगणात उतरले होते. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसनं ( शरदचंद्र पवार ) सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे ( Suresh Mhatre ) यांना उमेदवारी दिली होती. लोकसभेला अटीतटीच्या झालेल्या लढाईनंतर आता भाजप विरुद्ध भाजप, असं चित्र रंगलं आहे. खासदार कपिल पाटील यांनी भाजप आमदार किसन कथोरे यांच्यावर 'तुतारी'चं काम केल्याचा आरोप केला आहे. तसेच, 4 जूननंतर काहींचा करेक्ट कार्यक्रम केला जाईल, असं वक्तव्य करत कपिल पाटील यांनी अप्रत्यक्षपणे आमदार कथोरे यांना लक्ष्य केलं आहे. त्यामुळे पाटील-कथोरे वाद पेटण्याची शक्यता आहे.
भिवंडीत मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मुरबाडमध्ये कपिल पाटील ( Kapil Patil ) यांनी शनिवारी ( 25 मे ) भाजपच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी मतदान आणि पुढच्या व्यूहरचनेबाबत चर्चा केली. या बैठकीनंतर कपिल पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तुमच्या विजयात मुरबाडचे आमदार किसन कथोरे ( Kisan Kathore ) यांचा किती वाटा असेल, असा प्रश्न माध्यम प्रतिनिधीनं विचारल्यावर कपिल पाटील संतप्त झाले. "ज्या माणसानं आपल्याविरोधात उघडपणे काम केलं. 'तुतारी' आणि इतरांची मतदान केंद्र परिसरात लावण्यासाठी मदत केली. त्या माणसाचा आपल्या विजयात आणि मताधिक्यात काय संबंध असेल."
"आपण त्यात कोणाचेही नाव घेत नाही. त्यांचे नाव घेऊन आपण त्यांना नाहक मोठे पण करू इच्छित नाही," असं सांगत कपिल पाटील यांनी कथोरे यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघात मुरबाड मतदारसंघात काम केलं नसल्याचं सांगितलं आहे.
दरम्यान, कपिल पाटील यांनी कथोरे यांच्यावर निशाणा साधल्यानं येत्या काळात हा वाद चिघळण्याची शक्यता आहे. भिवंडी मतदारसंघ, ठाणे जिल्हा भाजप कार्यकारणीत कथोरे समर्थकांना डावलण्यात येत असल्याचं बोललं जात आहे. त्यापार्श्वभूमीवर कथोरे समर्थकांनी नाराजीही व्यक्त केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.