Satyajeet Tambe  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Satyajit Tambe : नाशिककरांनो जागे व्हा, हीच वेळ आहे संघर्ष करण्याची... आमदार सत्यजित तांबे झाले सक्रिय !

MLA Satyajit Tambe On Nashik Pune Railway : केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडून नाशिक पुणे रेल्वे प्रकल्प स्थगित करण्यात आला आहे. नाशिक पुणे रेल्वे प्रकल्प गुंडाळल्याने नाशिक, संगमनेर परिसरातील नागरिकांवर अन्याय?

सरकारनामा ब्युरो

Nashik Pune Railway News: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी कुमार यांनी नाशिक पुणे रेल्वे प्रकल्प स्थगित केला आहे. आता नाशिक शिर्डी हा रेल्वे मार्ग होणार आहे. मात्र या घोषणेने नाशिक पुणे आणि संगमनेर भागातील नागरिकांमध्ये तीव्र भावना आहेत.

या प्रश्नावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात तसेच पुढे आणि नाशिकच्या लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन दबाव निर्माण केला होता. सर्व खासदारांनी नाशिक पुणे रेल्वे मार्ग मार्गी लावण्यासाठी रेल्वे मंत्र्यांना विनंती केली होती. मात्र अचानक यामध्ये राजकीय माशी शिंकल्याने नवा वाद उभा राहण्याची चिन्हे आहेत.

आमदार सत्यजित तांबे यांनी या प्रश्नावर पुन्हा एकदा केंद्र सरकारला इशारा दिला आहे. नाशिक- पुणे रेल्वे मार्ग या भागातील औद्योगिक आणि नागरी विकासासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे रेल्वेमंत्र्यांनी हा प्रकल्प स्थगित करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा.

आमदार तांबे या विषयावर म्हणाले, नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा संगमनेर जुन्नर आणि पुणे यापेक्षाही नाशिककरांसाठी अधिक महत्त्वाचा आहे. नाशिकच्या या प्रकल्पाला स्थगित करणे विकासात अडथळा आणण्यासारखे आहे.

नाशिक शहर हे मुंबई आणि पुणे महानगर यांची निगडित आहे. मात्र सध्या नाशिक शहराचा विकास थांबल्यासारखी स्थिती आहे. कोणतेही नवे प्रकल्प आणि विशेषता आयटी प्रकल्प येथे येत नाहीत.

नाशिकच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी नाशिक पुणे रेल्वे अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. शेतकऱ्यांनी त्याचे महत्त्व ओळखले पाहिजे. जागरूक होऊन वेळीच या प्रश्नावर आवाज उठवण्याची गरज आहे. अन्यथा एक महत्त्वाचा रेल्वे प्रकल्प मागे पडू शकतो.

नाशिक शिर्डी रेल्वे प्रकल्पासाठी यापूर्वी कोणीही आग्रह धरलेला नव्हता. नगरच्या काही सत्ताधारी मंत्र्यांकडून आपली राजकीय भूमिका भेटण्यासाठी शिर्डीचा आग्रह धरण्यात येत आहे. त्यामुळे रेल्वे मंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर नाशिकच्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नाशिक पुणे रेल्वे मार्ग मार्गी लागावा यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी लवकरच पुणे, अहिल्यानगर आणि नाशिकच्या लोकप्रतिनिधी व स्वयंसेवी संस्थांना संघटित केले जाणार आहे. नाशिक पुणे रेल्वे मार्ग पुन्हा एकदा राजकीय अजंड्यावर येण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT