Devendra Fadnavis, Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

MLC Election : नाशिक विधानपरिषदेसाठी इच्छुकांची संख्या मारुतीच्या शेपटीसारखी वाढली, शिंदे-फडणवीसांपुढे पेच

Nashik MLC Election : नाशिक विधानपरिषदेसाठी भाजपपाठोपाठ आता शिवसेनेतही इच्छुकांची संख्या वाढली आहे. याशिवाय राष्ट्रवादीमधून देखील माजी खासदार देविदास पिंगळे यांनी निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे.

Ganesh Sonawane

Nashik MLC Election : नाशिक विधानपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. त्यादृष्टीने महायुती तसेच महाविकास आघाडी देखील तयारीला लागली आहे. अशात मारुतीच्या शेपटीप्रमाणे सर्वपक्षीय इच्छुकांची संख्या देखील वाढत चालली आहे.

महायुतीत शिवसेनेने या जागेवर दावा केला आहे. कारण या जागेवर मागच्यावेळी शिवसेनेचे नरेंद्र दराडे हे उमेदवार होते. आता पुन्हा नरेंद्र दराडे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. शिवसेनेत सुरुवातील केवळ नरेंद्र दराडे हे प्रमुख दावेदार असल्याचे बोलले जात होते. मात्र, नंतर संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी, उपनेते अजय बोरस्ते, विजय करंजकर यांची नावे चर्चेत आली. त्यानंतर आता आमदार सुहास कांदे यांच्या पत्नी अंजुम कांदे यांचेही नाव इच्छुकांच्या यादीत समाविष्ट झाले आहे.

दराडे कुटुंबाकडे एकाच घरात दोन आमदारकी होत्या. पक्षात सर्वांना संधी मिळायला हवी अशी भावना शिवसेनेत तयार झाली असून ही भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पोहचवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

तर भाजपमधून सुरुवातीला यासंदर्भात मौन बाळगण्यात आले होते. मात्र, त्यानंतर स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते हे भाजपकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे समोर आले. महापौर पदासाठी देखील गणेश गिते यांच्या पत्तीचे नाव चर्चेत होते. मात्र तिथे संधी हुकल्याने विधानपरिषदेला तरी संधी मिळावी अशी अपेक्षा त्यांचे समर्थक करत आहे.

असे असतानाच आता भाजपमधून मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जाणारे निलेश बोरा यांचेही नाव चर्चेत आले आहे. याशिवाय भाजपमधून किसान सभेचे बापू पिंगळे आणि स्थायी समितीचे माजी सभापती सुरेश पाटील देखील इच्छुक आहेत. त्यामुळे आता भाजपपक्षश्रेष्ठी काय भूमिका घेणार हे बघावे लागणार आहे.

तसेच महायुतीमधील तिसरा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी(अजित पवार गट) मधून सुरुवातीला एकही नाव चर्चेत नव्हतं. मात्र आता माजी खासदार देवीदास पिंगळे यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पिंगळे यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली असून आपले प्राधान्य राष्ट्रवादी अजित पवार गटालाच राहिल, मात्र ऐनवेळी कोणताही निर्णय घेतला जाऊ शकतो असे सूचित केले आहे. १९९९ मध्ये पिंगळे हे अवघ्या दोन मतांनी या जागेवर निवडून आले होते. पिंगळे खासदार झाल्यानंतर डॉ. वसंतराव पवार सलग दोन वेळा निवडून आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT