Former MLA Narendra Darade files his nomination for the Nashik Legislative Council election amid growing political tensions within the Mahayuti alliance. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik MLC Election : विधानपरिषदेच्या आखाड्यात भुजबळ-दराडे यांचे मनोमिलन, हेच प्रेम विधानसभेपर्यंत कायम राहणार?

Chhagan Bhujbal, Narendra Darade : नाशिक विधानपरिषद निवडणुकीत महायुतीची उमेदवारी नरेंद्र दराडे यांना जाहीर झालेली आहे. भुजबळांनी दराडेंना पाठिंबा जाहीर केला असून महायुतीची भूमिका मान्य केली आहे.

Ganesh Sonawane

Nashik MLC Election : नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात नरेंद्र दराडे आणि छगन भुजबळ यांच्यात तीव्र राजकीय वैर असून, ते सर्वश्रुत आहे.

येवल्यातील स्थानिक निवडणुकांमध्ये मंत्री छगन भुजबळ व नरेंद्र दराडे यांचे दोघांचे दोन वेगवेगळे गट आहेत. दराडे व भुजबळ कुटुंबात स्थानिक राजकीय स्पर्धा असून सत्तेसाठी संघर्ष होत आला आहे. अलिकडे झालेल्या येवला नगरपालिका निवडणुकीत हा संघर्ष टोकाला गेला होता.

विधानपरिषदेच्या निवडणुकीत याच वैराचा वचपा भुजबळ काढतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात होत्या. मात्र, प्रत्यक्षात तसे काही घडताना दिसत नाही. याउलट मंत्री छगन भुजबळ यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा दर्शवला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने भुजबळ दराडे परिवाराचे मनोमिलन झाल्याचे पाहायला मिळत आहे.

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील उमेदवाराबाबत महायुतीची जी भूमिका आहे, तीच माझी आहे अशी भूमिका अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केली आहे.

इतकेच नव्हे तर, महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे बंधू किशोर दराडे यांनी राजकीय वैर बाजूला ठेवत माजी खासदार समीर भुजबळ यांची येवला येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन भेट घेतली. दोघांमध्ये निवडणुकीसंदर्भात दिर्घकाळ चर्चा झाली. समीर भुजबळांनी देखील आम्ही महायुतीचा धर्म पाळणार आहोत असा शब्द दराडेंना दिला. दोघांमधील या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

नाशिकमध्येही दराडे यांच्या विजयासाठी महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांची व आमदारांची एका हॉटेलात नुकतीच बैठक झाली. छगन भुजबळाचे पुत्र व विधानपरिषद आमदार पंकज भुजबळ हे देखील या बैठकीला आवर्जुन उपस्थितीत होते. विशेष म्हणजे फोटो काढताना पंकज भुजबळ हे गळ्यात गळा घालून किशोर दराडे व नरेंद्र दराडे यांच्या मधोमध उभे असल्याचे पाहायला मिळाले. हे चित्र पाहुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगली.

परंतु विधानपरिषदेच्या आखाड्यात भुजबळ -दराडे परिवाराचे झालेले हेच मनोमिलन पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत कायम राहणार का? हे पाहणे उत्सुकतेचे असेल. येवल्यात मध्यंतरी पोटनिवडणुकीचे वारे वाहत होते. मात्र, भुजबळांची राज्यसभेवर जाण्याची संधी हुकली अन् पोटनिवडणुकीचे वारेही अचानक थांबले.

या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून समीर भुजबळ तयारी करत होते. तर उबाठाकडून नरेंद्र दराडे यांचे पुत्र कुणाल दराडे हेही तयारीत होते. परंतु आता विधानपरिषद निवडणुकीत दराडे-भुजबळ यांचे झालेले मनोमिलन पाहाता पुढच्या विधानसभेपर्यंत येवल्यात हेच चित्र कायम राहणार का? हे वेळ आल्यावरच समजेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT