Nashik MLC Election : नाशिक विधानपरिषद निवडणुकीत राज्यातील पहिला प्रयोग ; मतदारांची ओळख आता फेस रिकग्नेशनने

Nashik MLC Election Face Recognition : नाशिक विधान परिषदेसाठी १८ जून रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोग नाशिकमध्ये वेगळा प्रयोग करणार आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असणार आहे.
 Nashik MLC
Nashik MLC Sarkarnama
Published on
Updated on

Nashik MLC Election : राज्यात विधान परिषदेच्या एकूण 17 जागांसाठी निवडणूक घेण्यात येत आहे. मात्र, निवडणुक आयोगाकडून नाशिक विधानपरिषद निवडणुकीत वेगळा प्रयोग राबवण्यात येणार आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असणार आहे.

सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदारांच्या फोटो आयडीला फारसे यश येत नसल्याने फेस रिकग्नेशनची संकल्पना विचाराधीन आहे. कमी मतदार संख्या असल्यास हा प्रयोग राबवणे सहज शक्य आहे.

नाशिक विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत अवघे 619 मतदार आहे. त्यामुळे नाशिकमध्ये यासंदर्भातील राज्यातील पहिला प्रयोग राबवण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने तत्त्वतः मान्यता दिली आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने देखील कामकाज सुरू केले आहे.

नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या प्रयोगासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी सी डॅक या मान्यताप्राप्त संस्थेने खास अॅप तयार केले आहे. नाशिक महापालिकेसह अन्य नगरपालिकांमधील मतदारांचे फोटो या अॅप मध्ये घेण्यात येत आहेत. हे फोटो आणि माहिती संकलित झाल्यानंतर ती नोंदवली जाणार आहे.

 Nashik MLC
Nashik MLC Election : दराडेंना अजूनही गोकुळ गितेंवर भरोसा नाय, महायुतीच्या सगळ्या नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलवण्याचा निर्णय

विधान परिषदेसाठी १८ जून रोजी मतदान होणार आहे. मतदान करताना आधी मतदार नगरसेवकाला चेहरा स्कॅन करून तपासले जाणार आहे आणि त्यानंतर प्रवेश दिला जाईल. त्यामुळे या मतदाराने मतदान केल्यानंतर अॅपमध्ये नोंद होईलच, परंतु ज्या ज्या ठिकाणी मतदान केंद्रे आहेत तेथील तहसीलदारांनासुद्धा ती कळेल. त्यामुळे दुबार मतदानाला चाप बसेल.

संबधित अॅपमध्ये एकाचवेळी अनेक प्रकारचे नोंद घेतली जाणार असल्याने या अॅपवरूनच जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना बसल्या जागी कोणत्या तालुक्यात किती मतदान झाले याची अद्ययावत माहिती उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यामुळे दर दोन तासांनी किती मतदान झाले याची केंद्रावरून माहिती संकलित करण्यासाठी वेळ घालवण्याची गरज पडणार नाही.

 Nashik MLC
MLC Election : नाशिक विधानपरिषदेत अखेरच्या अर्ध्या तासात चित्र पालटले, गोकूळ गितेंनी गेलेली हवा भरली...

राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त चोक्कलिंगम यांनी नाशिकमध्ये होणाऱ्या या प्रयोगाला मान्यता दिली आहे. अर्थात हा प्रयोग करुन बघितला जात असल्याने मतदाराचे फेस रिकग्नेशन होण्यात अडचणी आल्या तरी त्यांना मतदान करू दिले जाणार आहे. त्यामुळे मतदार नगरसेवक किंवा उमेदवारांनी शंका घेण्याचे कारण नाही. अशी माहिती नाशिकच्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी मधुमालती सरदेसाई यांनी दिली आहे.

दुबार मतदान टाळण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न निवडणूक आयोग सासत्याने करत असते. परंतु कितीही दक्षता बाळगली तरीही पूर्णपणे त्याला यश येत नाही. त्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचा फेस रिकग्नेशनचा एक प्रयोग नाशिक विधानपरिषद निवडणुकीत करुन बघितला जाणार आहे. मर्यादित मतदारसंख्या असलेल्या मतदारसंघात तो यशस्वी झाल्यास भविष्यात तो इतर ठिकाणीही आमलात आणला जाईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com