Nashik Legislative Council election controversy: विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीतील जागावाटपाचा तिढा आजून सुटलेला नाही. भाजपने शिवसेनेकडे नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगर यापैकी एका जागेची मागणी केली आहे. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला असून तोडगा निघालेला नाही.
अशातच भाजप आणि शिवसेनेतील पेच सुटला नसतानाच मंत्री गिरीश महाजन यांचे खंदे समर्थक भाजपचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गिते हे आज अर्ज घेणार आहेत. तसेच शहर उपाध्यक्ष नीलेश बोरा हे देखील उमेदवारी अर्ज घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
एकीकडे शिवसेनेला ही जागा हवी आहे. शिवसेनेचे नरेंद्र दराडे पूर्ण तयारीत आहेत. असे असताना भाजपच्या इच्छुकांनी अर्ज घेण्याच्या हालचाली सुरु केल्याने शिवसेनेतील इच्छुकांची अडचण झाली आहे.
पक्ष सांगेल ते करेल : गिते
पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मला नाशिक विधानपरिदेसाठी उमेदवारीचा शब्द दिला होता. त्यामुळे मी आज उमेदवारी अर्ज घेत असल्याची माहिती गणेश गिते यांनी सरकारनामाशी बोलनाता दिली. पक्षाचा आदेश आल्यानंतरच अर्ज दाखल करु असं गिते म्हणाले.
दरम्यान, महायुतीच्या वाटाघाटीत ही जागा शिवसेनेला गेल्यास गिते अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी चर्चा आहे. त्यासंदर्भात विचारले असता, गिते यांनी अशा परिस्थितीत पक्ष जो आदेश देईल त्याचे पालन करु अशी भूमिका मांडली.
गिते यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याची भूमिका घेतल्याने महायुतीत तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत. महापालिकेत महापौर पदाच्या शर्यतीत देखील गणेश गिते यांच्या पत्नी दिपाली गिते यांचे नाव होते. मात्र, त्यावेळी त्यांना थांबवून विधानपरिषदेचा शब्द देण्यात आला होता असे सांगितले जाते. तेव्हा पासून ते या निवडणुकीसाठी तयारी करत आहेत.
एकीकडे, महायुतीमध्ये भाजपने सर्वांधिक संख्याबळाचा दाखला देत नाशिकच्या जागेवर दावा सांगितला आहे. तर गेल्यावेळी शिवसेनेचे नरेंद्र दराडे आमदार होते. त्यामुळे शिवसेनेला ही जागा हवी आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेचा विषय अधिक गुंतागुतीचा बनला आहे.
नाशिकच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर जोरदार हालचाली सुरु आहे. थेट गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत हा विषय गेला आहे. दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात नाशिक व जळगावच्या जागेवर चर्चा झाली. या घडामोडीनंतर आता भाजपच्या इच्छुकांनी थेट अर्ज दाखल करण्याची तयारी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आता शिवसेना काय भूमिका घेते याकडे लक्ष लागून आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.