Gokul Gite Narendra Darade Nashik MLC Election Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik MLC Election: गोकुळ गितेंचा करारी बाणा! म्हणाले, महाजनांचा अन् माझा संबंध नाही, कोणीही भेटायला येऊ द्या माघार नाही; दराडेंचं वाढलं टेन्शन

Nashik MLC Election: गोकुळ गिते थोड्याच वेळात मुंबईला मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती मिळते आहे.

Amit Ujagare

Nashik MLC Election: नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकीत आता खूपच रंगत आली आहे, कारण बंडखोर उमेदवार गोकुळ गिते यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवाराविरोधात नरेंद्र दराडे यांच्याविरोधात दंड थोपटले असून कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचं पुन्हा एका स्पष्ट केलं आहे. दराडेंनी स्वतः आपल्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केली तरी गिते हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. भाजपच्या सर्वच नेत्यांना त्यांनी चांगलाच घाम फोडला आहे. यानंतर आता ते मुंबईला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी रवाना होणार आहेत.

...तर दिल्लीलाही जाणार

निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं सांगताना गोकुळ गिते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, "काल मी प्रचारात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा माझ्या भावाला फोन आला होता. त्यांनी मला मुंबईला भेटीसाठी बोलावलं आहे. आज ते दिल्लीला आहेत, मात्र मी आज एकनाथ शिंदे यांना भेटणार आहे. मी आता देखील निवडणूक लढण्यावर ठाम आहे. मला जर दिल्लीला बोलावलं तरी मी जाईन, मुख्यमंत्र्यांना भेटायला"

दराडेंनी दिलगिरी व्यक्त केली पण...

"काल किशोर दराडे मला भेटायला आले होते, पण मी त्यांना भेटलो नाही. काल त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली. पण आधी बोलायचं आणि नंतर दिलगिरी व्यक्त करायची ही काही संस्कृती नाही. मी भाजपत सक्रिय नाही, माझे बंधू गणेश गीते भाजपात आहेत त्यामुळे मी त्यांच्यासाठी काम करत होतो. माझ्या उमेदवारीवर जळगावचा प्रश्न अवलंबून नाही. दराडे यांच्या विरोधात मतदार आहेत, मागच्या सहा वर्षात दराडेंनी कुठलीही कामं केलेली नाहीत. आजच्या भेटीत देखील काही मार्ग निघेल अस वाटत नाही, मी तडजोड करणार नाही"

महाजनांशी आपला संबंध नाही - गिते

"इथले जे आमदार आहेत ते निष्क्रिय आहेत, त्यामुळं मतदार मला लढण्यासाठी सांगत आहेत. नेत्यांचा मान राखण्यासाठी मी थांबू शकतो, घरात बसू शकतो पण पाठिंबा देऊ शकत नाही. दराडे यांना जिंकून आण्यासाठी त्यांना पाठिंबा हवा आहे. माझं आणि गिरीश महाजन यांचे फार काही संबंध नाहीत पण माझे बंधू गणेश गीते यांचे महाजन यांच्यासोबत जवळचे संबंध आहेत. गणेश गिते देखील मला थांबण्यासाठी सांगत आहेत. गेल्या 8 दिवसापासून मला प्रलोभनं येत आहेत, पण मला ते नको आहे, भीक घेणार नाही. मध्यस्थींमार्फ़त मला प्रलोभनं दिली जात आहेत," असा आरोपही यावेळी गोकुळ गिते यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT