Congress conflict : परस्पर कारभार करणाऱ्या हर्षवर्धन सपकाळांना घरचा रस्ता दाखवा : पुण्यातील काँग्रेस नगरसेवकाची थेट प्रदेशाध्यक्षांविरोधातच दिल्लीकडे तक्रार

Harshvardhan Sapkal Controversy : महापालिका निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने काँग्रेसची साथ सोडत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढली. अशावेळी विधानपरिषदेच्या निवडणुकीत शरद पवारांच्या उमेदवाराला पाठिंबा देणे कितपत योग्य होतं? असं सवाल या नगरसेवकाने उपस्थित केला आहे.
Harshvardhan Sapkal
Harshvardhan SapkalSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 10 Jun : अमरावती आणि चंद्रपूरमध्ये पक्ष विरोधी कारवाई करणाऱ्या नगरसेवकांवर ज्या पद्धतीने निलंबनाची कारवाई करण्यात आली, त्याच पद्धतीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी पुण्यातील काँग्रेस नगरसेवक आणि माजी शहराध्यक्ष असलेल्या अरविंद शिंदे यांनी थेट दिल्लीतील प्रक्षश्रेष्ठींकडे केली आहे.

अरविंद शिंदे यांनी मल्लिकार्जून खरगे आणि के.सी. वेणुगोपाल यांना ई-मेल करत तक्रार केली असल्याचं सांगितलं जात आहे. या तक्रारी मागचं मूळ कारण विधान परिषदेची निवडणूक असल्याचं समोर आला आहे.

पक्षाच्या वरिष्ठांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत वेळी स्थानिक नगरसेवक अथवा पदाधिकाऱ्यांशी कोणतीही चर्चा न करता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला पाठिंबा दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पाठिंब्यांपूर्वी पुण्यातील कोणाशीही प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी चर्चा केली नसल्याचं शिंदे यांचे म्हणणं आहे.

Harshvardhan Sapkal
Meenakshi Natarajan : ना FIR, ना पोलीस तपास, ना शिक्षा..., तरीही काँग्रेसच्या मिनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद कसा झाला? लपवलेलं प्रकरण नेमकं काय आहे?

महापालिका निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने काँग्रेसची साथ सोडत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढली. अशावेळी विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देणे कितपत योग्य होतं असं सवाल शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

याबाबत निर्णय घेताना पुण्याचे प्रभारी असलेल्या आमदार सतेज पाटील यांना देखील विश्वासात घेतलं नसल्याचा देखील सांगितलं जात आहे. तसेच शरद पवार यांच्या पक्षातील उमेदवारांनी अर्ज माघारी घेत महायुतीच्या उमेदवाराला विजयी होण्यास मदत केली. यावेळी देखील कोणतीही चर्चा करण्यात आली नाही.

Harshvardhan Sapkal
Iran US Conflict : कालपर्यंत इस्रायलला हल्ले करू नका म्हणणाऱ्या ट्रम्प यांचाच इराणवर हल्ला; 'अपाचे' हेलिकॉप्टर पाडल्याने जग पुन्हा युद्धाच्या उंबरठ्यावर?

त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीत फिक्सिंग करताना काँग्रेसच्याच काही नेत्यांनी महायुतीला मदत केल्याचा आरोप अरविंद शिंदे यांनी आपल्या पत्रामध्ये केला आहे. दरम्यान नुकतेच काँग्रेसकडून प्रभारी शहराध्यक्ष असलेल्या अरविंद शिंदे यांना हटवून नव्याने दोन शहराध्यक्षांची नियुक्ती केली आहे. यानंतर अरविंद शिंदे हे नाराज असल्याचं देखील सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेली ही तक्रार चर्चेत आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com