Pune NCP News: पुण्यातील वाद पोहोचला सुनेत्रा पवारांपर्यंत! अखेर पार्थ पवारांना करावा लागला हस्तक्षेप

NCP leaders clash in Pune politics: पुण्यात राष्ट्रवादीतील पदनियुक्तींवरून निर्माण झालेला वाद थेट सुनेत्रा पवारांपर्यंत पोहोचला. जयदेव इसवे यांच्या नाराजीनंतर खासदार पार्थ पवारांनी हस्तक्षेप करत नियुक्तीला स्थगिती दिल्याची माहिती समोर आली आहे.
Parth Pawar intervenes in Pune NCP dispute
Parth Pawar intervenes in Pune NCP disputeSarkarnama
Published on
Updated on

NCP internal disagreement in Pune: राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पुण्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये सातत्याने पक्षांतर्गत वाद उफाळून येत असल्याचे चित्र दिसत आहे. पदनियुक्त्या, संघटनात्मक निर्णय आणि स्थानिक नेतृत्वातील मतभेदांमुळे निर्माण होणारे वाद आता थेट खासदार पार्थ पवार यांच्यापर्यंत पोहोचू लागले आहेत. त्यामुळे पक्षातील नाराजी दूर करून समेट घडवून आणण्याची जबाबदारीही पार्थ पवार यांच्यावर येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

विधान परिषद निवडणूक आणि पुणे महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदाच्या नियुक्त्यांमध्ये डावलण्यात आल्याची भावना निर्माण झाल्यानंतर पश्चिम भागाचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक सुभाष जगताप यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता सामाजिक न्याय विभागाच्या पश्चिम भागासाठी स्वतंत्र शहराध्यक्ष नियुक्त करण्याच्या निर्णयामुळे पक्षात नवा वाद निर्माण झाला.

सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष जयदेव इसवे हे गेली २७ वर्षे पक्षात सक्रिय असून त्यांची नियुक्ती अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली होती. मात्र, सुभाष जगताप यांनी पश्चिम भागासाठी किशोर कावरे यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती केल्याने इसवे नाराज झाले. त्यांनी थेट पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा सादर केला.

Parth Pawar intervenes in Pune NCP dispute
Talathi Recruitment Scam: 15 लाख द्या अन् तलाठी व्हा! एका फोनमुळे फुटलं बोगस भरती रॅकेटचं बिंग

हे प्रकरण खासदार पार्थ पवार यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी तत्काळ हस्तक्षेप केला. संबंधित नियुक्ती प्रक्रियेची माहिती घेतल्यानंतर नवीन नियुक्तीला स्थगिती देण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. त्यामुळे तात्पुरता वाद निवळला असला तरी पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.

इसवे यांनीही या निर्णयावर आक्षेप घेताना, प्रदेश पातळीवरील मान्यता न घेता नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप केला. "पश्चिम विभागाची कार्यकारिणी अद्याप जाहीर झालेली नसताना केवळ सामाजिक न्याय विभागासाठी स्वतंत्र नियुक्ती करण्यात आली. पार्थ पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आली," असे इसवे यांनी सांगितले.

Parth Pawar intervenes in Pune NCP dispute
Pune News: जिल्हाधिकाऱ्यांची बनावट सही करून एनए करण्याचा प्रयत्न; तलाठ्याच्या सतर्कतेमुळे धक्कादायक प्रकार उघड

यापूर्वीही जगतापांविरोधात तक्रारी

सुभाष जगताप यांनी पश्चिम विभागाची कार्यकारिणी जाहीर करण्यास विलंब केल्याचा आरोप यापूर्वीही करण्यात आला होता. पक्षाचे कार्याध्यक्ष रामदास गाडे पाटील यांनी कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत जगताप यांच्याविरोधात बंडाचे निशाण फडकावले होते. त्यांनीही सुनेत्रा पवार यांच्याकडे तक्रार केली होती.

दरम्यान पक्षातील वाढती नाराजी, स्थानिक नेत्यांमधील संघर्ष आणि संघटनात्मक वाद लक्षात घेता खासदार पार्थ पवार यांनी पुण्यातील घडामोडींवर अधिक लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com