Independent candidate Gokul Gite celebrates his victory in the Nashik MLC election. The result has sparked debate over the decisive role played by Shiv Sena UBT votes. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik MLC Election : दराडेंच्या पराभवाला ठाकरेंची 38 मते कारणीभूत; शिंदेंचा बदला घेण्यासाठी राऊतांची खेळी, पण गोकुळ गीतेंनी ठाकरेंनाच दिला धक्का

Gokul Gite Victory : अपक्ष उमेदवार अर्थात भाजपचे अदृश्य बंडखोर गोकुळ गीते नाशिक विधानपरिषद निवडणुकीत जिंकले. त्यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव केला. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर राजकारण घडले. त्यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचेही योगदान आहे.

Sampat Devgire

Nashik MLC Result News, 23 Jun : नाशिक विधानपरिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते विजयी झाले. त्यांच्या विजयात महायुतीपेक्षाही शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे योगदान निर्णयाक होते. मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले.

अपक्ष उमेदवार अर्थात भाजपचे अदृश्य बंडखोर गोकुळ गीते नाशिक विधानपरिषद निवडणुकीत जिंकले. त्यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव केला. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर राजकारण घडले. त्यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचेही योगदान आहे.

गोकुळ गीते यांना 358 मते मिळाली. यामध्ये भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची किती मते मिळाली हे कोणीही सांगू शकत नाही. मात्र त्यांच्या विजयात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या 38 मतांचा समावेश आहे. हे मतदान अधिकृत घोषणा करून देण्यात आले होते.

विधानपरिषदेची नाशिकची जागा महाविकास आघाडीने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला सोडली होती. त्याचे माजी आमदार वसंत गीते आणि अनिल कदम यांनी उमेदवारी अर्ज नेला होता. ऐनवेळी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करता अप्रत्यक्षरीत्या भाजपच्या बंडखोराला मदतीचा हात दिला. त्यावरून मोठ्या प्रमाणावर टीका देखील झाली होती.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी निवडणुकीत एकनाथ शिंदे पक्षाच्या उमेदवाराला धक्का देणार असे राजकीय विधान केले होते. पक्षाच्या मतदारांनी पक्षाचा आदेश आल्यावर नैसर्गिकरीत्या अपक्ष गोकुळ गीते यांना मतदान केले होते. संजय राऊत यांनी त्याबाबत सहमतीही दर्शवलेली होती.

गोकुळ गीते यांच्या विजयात शिवसेना ठाकरे पक्षाच्या मतदानाचे महत्त्वाचे योगदान होते. या मतांच्या भरवशावरच गीते यांनी निवडणुकीचे धाडस केले होते, असे म्हणता येईल. मात्र ठाकरेंच्या मतदानच्या आधारे निवडून आलेल्या गीते यांनी क्षणाचाही विलंब न करता सायंकाळ होता होता शिवसेनेच्या शिंदे पक्षाचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले.

ठाकरे पक्षाचे सहा खासदार ऑपरेशन टायगर असे गोंडस नाव देऊन शिंदे यांनी फोडले. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोपही करण्यात आला. हा घाव उद्धव ठाकरे यांच्या जिव्हारी लागलेला होता. ही जखम ताजी असतानाच गीते यांनी त्यांना दुसरा धक्का दिला आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष ठेच लागल्यावर पुन्हा तीच चूक करतो, की जाणीवपूर्वक चुका करतो याची चर्चा सुरू आहे. गोकुळ गीते यांना मतदान करण्यापूर्वी सहा खासदार फुटले या घटनेचा बदला म्हणून मतदान होत असल्याची भावना नगरसेवकांची. या पार्श्वभूमीवर गीते यांनी शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश करून ठाकरे यांना दुसरा धक्का दिला आहे.

धक्क्यावर धक्के बसत असल्याने ठाकरे पक्षाला हा धक्का जाणवला नाही की काय ही चर्चा नाशिकच्या कार्यकर्ते आणि नगरसेवकांमध्ये सुरू आहे. संजय राऊत यांनी आधी मतदान दिले आणि त्यानंतर निवडून आलेला एक विधानपरिषद सदस्य शिवसेना शिंदे पक्षाला गिफ्ट म्हणून दिला, असे म्हणता येईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT