Operation Tiger : ऑपरेशन टायगरला हवा; उद्धव ठाकरेंच्या बैठकीला 'या' तीन खासदारांची दांडी; कारणही आले समोर!

Political News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक बोलवली आहे. या महत्त्वाच्या बैठकीला तीन खासदार गैरहजर असल्याचे समजते.
Uddhav Thackrey
Uddhav ThackreySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : गेल्या काही दिवसापासून राजकीय वर्तुळात ऑपरेशन टायगरच्या चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ऑपरेशन टायगरच्या चर्चेवरून दोन्ही शिवसेनेकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातच मातोश्रीवर रविवारी दुपारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक बोलवली आहे. या महत्त्वाच्या बैठकीला तीन खासदार गैरहजर असल्याचे समजते. त्यामुळे पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरु असतानाच गैरहजर राहण्याचे मोठे कारण समोर आले आहे.

मातोश्रीवर रविवारी दुपारी १२ वाजता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. यामध्ये विविध महत्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात येणार होती. त्यामुळे या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झाले असतानाच या बैठकीला परभणीचे खासदार संजय जाधव, धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचोरे गैरहजर असल्याचे समोर आले आहे. या बैठकीला नऊ पैकी सहा खासदार हजर असल्याचे समजते.

Uddhav Thackrey
Maharashtra News Live Update : ठाकरेंच्या खासदारांच्या बैठकीला सुरूवात, पाच जणांचीच उपस्थिती

परभणीचे खासदार संजय जाधव यांनी मतदारसंघात अधिकमासामुळे धोंडे जेवणाचा कार्यक्रम असल्याने गैरहजर राहणार असल्याचे कळवले आहे. तर दुसरीकडे धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर या बैठकीस गैरहजर राहणार असल्याबाबत त्यांनी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना कळवले आहे. त्यांचा मुलगा आजारी असल्याने बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

Uddhav Thackrey
Uddhav Thackeray Action : उद्धव ठाकरे 'अ‍ॅक्शन मोड'वर, खासदारांची बैठक बोलावली, मोठा निर्णय होणार!

या बैठकीपूर्वीच शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचोरे देखील नॉट रिचेबल असल्याच्या चर्चा प्रसार माध्यमांत रंगली होती. गेल्या चार दिवसापासून ते कुटूंबासोबत सहलीवर गेले असल्याचे समजते. त्यामुळे ते बैठकीस हजार राहणार का याबाबतचा सस्पेन्स कायम होता. मात्र, त्यांनी ही बाहेर असल्याने बैठकीला गैरहजर राहणार असल्याचे कळविल्याचे समजते.

Uddhav Thackrey
Operation Tiger News : 'मातोश्री'वरील बैठकीपूर्वीच उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराचे रोखठोक विधान; ऑपरेशन टायगरची हवा काढतानाच महायुतीची धाकधूक वाढवली

मातोश्रीवर आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस खासदार संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे ही खासदार मंडळी बैठकीस उपस्थित आहेत. त्यासोबतच या बैठकीस माजी खासदार विनायक राऊत, आमदार मिलिंद नार्वेकर उपस्थित असल्याचे समजते. त्यासोबतच हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे विधानपरिषद निवडणुकीमुळे तर खासदार संजय देशमुख यांच्या मुलाचा विवाह सोहळा असल्याने या बैठकीस ऑनलाइन हजर असल्याचे समजते. ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील बैठकीसाठी 'मातोश्री'वर पोहोचलेले नव्हते, मात्र त्यांनी आपण बैठकीला येत असल्याचे पक्षाला आधीच कळवले आहे.

Uddhav Thackrey
UBT Shivsena : मराठवाड्यातील आणखी एक खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? ऑपरेशन टायगरची पुन्हा चर्चा, 'त्या' बैठकीला दांडी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com