Gokul Gite, Uday Samant Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik MLC Election : मंत्री उदय सामंतांनी दुसऱ्यांदा लावला जोर; दराडेंना बिनशर्त पाठिंबा देण्याची गोकुळ गितेंना विनंती

Uday Samant Appeals to Gokul Gite for Withdrawal : माघारीचा दिवस आता उलटला आहे. मात्र आता गोकुळ गिते यांनी महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना बिनशर्त पाठिंबा द्यावा अशी विनंती मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. ते नाशिकमध्ये आले आहेत.

Ganesh Sonawane

Nashik MLC Election : भाजप नेते गणेश गिते यांचे बंधू गोकुळ गीते यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना मोठा हादरा बसला आहे. बंडखोरी रोखण्यात भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन आणि शिवसेना मंत्री उदय सामंत यांना अपयश आलं आहे. मात्र, आजूनही त्यांनी प्रयत्न सोडलेले दिसत नाही.

मंत्री महाजन व सामंत दोन्ही नेते आज नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. दोघांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक होत आहे. ४ जून रोजी माघारीचा अंतिम दिवस होता. त्याआधी ३ जूनला मंत्री उदय सामंत नाशिकमध्ये आले होते. नाशिक विधान परिषद निवडणुकीतील बंडखोरी शमवण्यासाठी मंत्री उदय सामंत यांनी नाशिकमध्ये बैठका घेतल्या.

गणेश गिते यांच्यासह गोकुळ गिते यांना भेटण्याचा प्रयत्न केला पण भेट झाली नव्हती. त्यानंतर मात्र, उदय सामंत यांनी मंत्री गिरीश महाजन यांना साद घालत दोन्ही भावांना माघार घ्यायला लावा व महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा विजय सुककर करा अशी विनंती केली होती.

त्यानंतर महाजनांच्या मध्यस्थीनंतर गणेश गिते यांनी ४ जून रोजी शेवटच्या क्षणी माघार घेतली. मात्र, नरेंद्र दराडे यांचे पुत्र कुणाल दराडे यांनी केलेल्या कथित 'बापाच्या' वक्तव्यामुळे दुखावलेल्या गोकुळ गिते यांनी शेवटपर्यंत माघार घेतलीच नाही. त्यामुळे नरेंद्र दराडेंपुढे मोठं आव्हान उभं राहिलं आहे.

मंत्री उदय सामंत पुन्हा दुसऱ्यांदा नाशिकमध्ये आले असून गोकुळ गिते यांनी नरेंद्र दराडे यांना बिनशर्त पाठिंबा द्यावा अशी विनंती त्यांनी केली आहे. वेळ पडली तर गिते बंधूंच्या घरी जाऊन विनंती करील. कुणाल दराडे यांनाही घेऊन जाईल असे सामंत यांनी म्हटले आहे. दुसरीकडे गिरीश महाजन हे देखील बंडखोर गोकुळ गिते व प्रसाद हिरे या दोघांची भेट घेऊन दोघांनाही माघार घेण्याची विनंती करणार आहेत. तर, मंत्री दादा भुसे प्रसाद हिरेंशी बोलणार असल्याचं सामंतांनी सांगितलं.

मात्र, गोकुळ गिते आपल्या उमेदवारीवर ठाम असल्याचे दिसत आहे. मी भाजपचा बंडखोर नाही माझ्यावर दबाव आणू नका असं गोकुळ गिते यांनी म्हटलं आहे. समोरच्या उमेदवाराच्या मुलाने माझा बाप काढल्याने मला उमेदवारी करणे क्रमप्राप्त असल्याचं गोकुळ गितेंनी म्हटलं आहे. महायुतीचे उमेदवार हे निष्क्रीय उमेदवार आहे, त्यांच्यासाठी माझ्यावर दबाव आणू नका अशी विनंती गोकुळ गिते यांनी माध्यमांशी बोलताना महायुतीच्या नेत्यांना केली आहे.

निवडणूक फार पुढे गेली आहे, जाहीर पाठिंबा देण्याचा विषयच येत नाही. मी प्रचाराला देखील लागलो आहे असे गोकुळ गिते यांनी म्हटलं आहे. सर्वाधिक नगरसेवक माझ्यासोबत येतील असा विश्वास गोकुळ गिते यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे गोकुळ गिते यांची ही भूमिका पाहाता महाजन व सामंत या दोघांना आज तरी गोकुळ गिते यांची मनधरणी करण्यात कितपत यश येतं की पुन्हा पदरी अपयश पडतं हे पाहावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT