MLC Election : "ज्यांनी माझा बाप काढला त्यांच्यासाठी माघार नाही", गोकुळ गितेंनी उमेदवारी कायम ठेवली... नाशिकमध्ये दराडे विरुद्ध गिते सामना रंगणार

Nashik MLC Election, Gokul Gite VS Narendra Darade,नाशिकमध्ये भाजपचे गणेश गिते यांचे बंधू गोकुळ गिते यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला. त्यामुळे नरेंद्र दराडे विरुद्ध गोकुळ गिते अशी लढत होणार आहे.
Gokul Gite, Narendra Darade
Gokul Gite, Narendra DaradeSarkarnama
Published on
Updated on

Nashik MLC Election : ज्यांनी माझा बाप काढला त्यांच्यासाठी माघार का घ्यायची? असा सवाल उपस्थितीत करत भाजपच्या गणेश गिते यांचे बंधू गोकुळ गिते यांनी महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात विधानपरिषद निवडणुकीत आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे.

त्यामुळे नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे विरुद्ध अपक्ष गोकुळ गिते अशी लढत होणार आहे. भाजपच्या प्रसाद हिरे यांनीही अर्ज कायम ठेवल्याने नाशिकमध्ये आता तीन उमेदवार रिंगणात राहिले आहेत. विशेषत: दराडे विरुद्ध गिते सामना रंगणार आहे.

नाशिक विधानपरिषद निवडणुकीत आज अंतिम माघारीच्या दिवशी हायहोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. तीन वाजेपर्यंत अंतिम माघारीचा कालावधी होता. सुमारे अडीच वाजेच्या सुमारास भाजपचे गणेश गिते माघारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. तेवढ्यात एका जवळच्या कार्यकर्त्याने गणेश गिते यांचे बंधू गोकूळ गितेंना फोन लावला. आपल्याला माघार घ्यायची आहे गणेश भाऊ आले तर तुम्ही या ..

त्यावर गोकूळ गिते यांनी 'ज्यांनी माझा बाप काढला त्यांच्यासाठी माघार का घ्यायची?" असा संतप्त सवाल उपस्थितीत केला. "महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे पुत्र कुणाल दराडे यांनी गणेश गिते व गोकुळ गिते यांच्या बापालाही माघार घ्यावी लागेल असे वक्तव्य केल्याचा आरोप गोकुळ गिते यांनी केला". नरेंद्र दराडे यांचा भाऊ व मुलगा दोघांनी उर्मट भाषा वापरल्याचा आरोप गोकुळ गिते यांनी केला.

Gokul Gite, Narendra Darade
MLC Election : नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे बंडही शमले; गोकुळ गिते मात्र अडून बसले, हॉटेलात झालेल्या त्या बैठकीत काय ठरलं?

यावेळी गणेश दराडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. कुणाला दराडे यांनी एका नगरसेवकाशी बोलताना आई-वडिलांवरुन शिविगाळ केली. त्यामुळे हा विषय वाढला व वेगळं वळण मिळाल्याचं गणेश गिते म्हणाले. निवडणुकीच्या आधीच आमचा बाप काढायला लागले. आमचाही राजकीय बाप देवेंद्र फडणवीस आहे हे विसरु नका ... असं गणेश गिते म्हणाले.

त्यानंतर गणेश गिते यांनीही गोकूळ गिते यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु माघारीची ३ वाजेची मुदत संपूनही गोकूळ गिते माघारीसाठी आले नाही. गोकुळ गिते यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे.

Gokul Gite, Narendra Darade
Jalgaon MLC Election : बालेकिल्ल्यातच महाजनांच्या डोक्याला ताप; शिवसेनेच्या बंडखोर रेश्मा काळे नॉट रिचेबल, अर्ज मागे न घेण्यावर ठाम

त्यामुळे आता नरेंद्र दराडे विरुद्ध गोकुळ गिते अशी फाईट नाशिकमध्ये होणार आहे. भाजपच्या प्रसाद हिरे यांनीही अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे नरेंद्र दराडे, गोकुळ गिते, प्रसाद हिरे असे तीन उमेदवार नाशिक विधानपरिषदेच्या रिंगणात निवडणूक लढवणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com