Nashik MLC Election : नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांचा दारूण पराभव करत अपक्ष गोकुळ गीते यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. गोकुळ गीते यांना ३५८ मते मिळाली तर महायुतीचे नरेंद्र दराडे यांना २४७ मते मिळाली. त्यामुळे महायुतीची विशेषत: भाजपची मतं फुटली यावर शिक्कामोर्तब झाले. या निकालाचे आता तीव्र राजकीय पडसाद उमटले आहेत.
निवडणूक निकाल जाहीर झाल्यावर महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे बंधू आमदार किशोर दराडे यांनी संताप व्यक्त केला. शिवसेनेचे नेते अजय बोरस्ते यांनीही, या निकालावरून फाटाफूट झाली, हे स्पष्ट होते. सहकारी पक्षानेच केसाने गळा कापला, अशी स्थिती आहे. या संदर्भात वरिष्ठ नेत्यांना अहवाल देण्यात येणार आहे. या निकालाने महायुतीत अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले, असे सांगितले.
निकालानंतर आमदार दराडे संतप्त झाले होते. हा निकाल म्हणजे महायुती अस्तित्वात नाही, हे स्पष्ट होते. भाजपने आमचा विश्वासघात केला आहे. आमच्या सोबत राहून आमच्या पराभवासाठी काम केले, असा गंभीर आरोप त्यांनी केला. प्रतिस्पर्धी उमेदवार गीते यांनी माघार घ्यावी यासाठी वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी केली होती. भाजपचे वरिष्ठ मंत्री देखील होते. मग ज्या उमेदवारांनी माघार घेतली तो निवडून कसा येतो. हा तर वरिष्ठ नेत्यांची विश्वासघात आहे, असाही आरोप केला.
स्पर्धक उमेदवाराने माघारीसाठी आमच्याकडून पैसे घेतले. तेच पैसे मतदारांना वाटले. आमच्यासोबत व्यासपीठावर एकत्र आले. प्रत्यक्षात मात्र आमच्या पराभवासाठी काम केले. नाशिक विधानपरिषद निवडणुकीच्या निकालातून भाजपची मतं फुटली हे स्पष्ट होते. हे म्हणजे सोबत राहून पाठीत तलवार खुपसणे असा प्रकार झाला. याबाबत तातडीने वरिष्ठ नेत्यांना कळविणार आहे. असेही ते म्हणाले.
मुंबईहून गोकुळ गीतेंना फोन
या निकालानंतर खरंतर पराभूत उमेदवाराला सांत्वन आणि पाठिंबा देण्याची गरज होती. शिवसेनेत मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळाले. मुंबईहून विजयी उमेदवार गोकुळ गीते यांचे अभिनंदन करणारा फोन आला. आपल्यासाठी विमान पाठवीत आहोत. एक वाजता विमान नाशिकला पोहोचेल. तातडीने मुंबईला एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी यावे असे निमंत्रण गीते यांना देण्यात आले. त्यामुळे राजकारणाचा हा स्तर देखील चर्चेचा विषय झाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.