Nashik MLC : गोकुळ गीते यांच्या माघारीसाठी फक्त दबावच नव्हे तर "तो" धाकही? यामागे भाजप की शिंदेंची शिवसेना? एका पत्राने उडाली खळबळ

BJP's Message to Shivsena Eknath Shinde's Party Over Gokul Gite's withdrawal : विधान परिषद निवडणुकीत कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जाणारे गणेश गीते प्रबळ उमेदवार होते.
Nashik Legislative Council Election Politics; Girish Mahajan or Uday Samant and Gokul Gite
Nashik Legislative Council Election Politics; Girish Mahajan or Uday Samant and Gokul Gitesarkarnama
Published on
Updated on

Mahayuti News : नाशिक विधान परिषद निवडणूक बंडखोरीने गाजणार याची चाहूल भाजपला आधीच असावी. गीते बंधूंच्या माघारीसाठी भाजपने वापरलेली खेळी त्याचे कारण आहे. गीते यांची माघारी सरळ सरळ झालेली नाही, अशी आता राजकीय चर्चा रंगली आहे. कारण विधान परिषद निवडणुकीत कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय गणेश गीते प्रबळ उमेदवार होते. त्यांच्यासाठी ही जागा भाजपला हवी होती. तर महाजन यांनी त्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले.

विधान परिषदेच्या निवडणुकीत जळगाव आणि नाशिक या दोन्ही ठिकाणी भाजपकडे सर्वाधिक मतदार होते. दुसऱ्या क्रमांकाची मते आणि प्रभाव टाकणारे मंत्री शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे होते. हे आव्हान थेट कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना होते. त्यातून त्यांनी आपली सही सलामत राजकीय सुटका केल्याचे सध्याचे चित्र आहे.

भाजपचे बंडखोर गणेश गीते यांनी माघारीच्या शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेतला. त्याचवेळी आपले बंधू गोकुळ गीते यांना अपक्ष उमेदवारी करण्याचे संकेत त्यांनी दिले. या गीते बंधूंना वेसण घालण्याचे आव्हान आणि जबाबदारी अर्थातच महाजन यांच्यावर होती. गोकुळ गीते गेले आठवडाभर नरेंद्र दराडे यांना थेट आव्हान देत होते. शिवसेना शिंदे पक्षाने निवड केलेले उमेदवार म्हणून दराडे हे निवडणुकीत सामना झाल्यास टिकतील अशी स्थिती नव्हती. याची जाणीव झाल्यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांची खरी झोप उडाली आणि सर्व यंत्रणा कामाला लागले.

Nashik Legislative Council Election Politics; Girish Mahajan or Uday Samant and Gokul Gite
Nashik MLC Election : मी प्रचार थांबवतोय... गोकुळ गितेंनी एका शब्दात मिटवला विषय, दराडेंना पाठिंबा देण्याच्या प्रश्नावर बोलणं टाळलं

गणेश गीते भाजपच्या स्थायी समितीचे माजी सभापती असून गिरीश महाजन यांचे विश्वासू म्हणून त्यांना सलग दोन वेळा ही संधी मिळाली. त्यातून राजकीय सुबत्ता मिळालेल्या गीते यांची आकांक्षा वाढली होती, हे लपून राहिले नाही. त्यासाठी गीते यांना कायदेशीर कचाट्यात अडकविण्यासाठी एक यंत्रणा कार्यरत झाली होती. तसा आरोप थेट गीते यांनीच भाजपच्या काही सहकाऱ्यांवर केला होता.

म्हाडा प्रकरणात गीते यांच्या विरोधात दाखल झालेला गुन्हा हे त्याचे कारण होते. तर या प्रकरणात गीते आरोपी असूनही त्यांना अटक झाली. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. विधान परिषदेत बंडखोरीची शक्यता दिसताच शासनाकडून हा जामीन रद्द करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याची चर्चा आता येथे आहे.

यासंदर्भात एक जूनला गणेश गीते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. योगाने याच दिवशी विधी विभागाच्या उपसचिवांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या वकिलांना पत्र देऊन घेते यांचा जामीन रद्द करावा. त्यासाठी सर्वोच्च न्यायालया याचिका दाखल करण्याचे निर्देश होते. गीते आणि त्यांचे बंधू गोकुळ गीते यांच्या माघारीला हे पत्र कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे या पत्रावर सात मे अशी तारीख आहे. मात्र हा सर्व प्रकार पुढे आला तो विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावर. गणेश गीते गेले आठवडाभर मुंबईत तळ ठोकून होते. यास कालावधी मंत्री महाजन यांचे एक निकटवर्तीय सतत त्यांच्यासोबत होते. यातील बहुतांशी व्हिडिओ वाहिन्यांवर देखील प्रसारित झाले आहेत.

Nashik Legislative Council Election Politics; Girish Mahajan or Uday Samant and Gokul Gite
Nashik MLC Election : गोकुळ गितेंची माघार ठरली ; नरेंद्र दराडेंची धडधड आजूनही कायम

त्यामुळे नाशिकच्या विधान परिषद निवडणुकीत गोकुळ गीते यांच्या माघारीसाठी भाजपने फक्त दबाव तंत्र नव्हे तर धाकतंत्र देखील वापरले. त्यादृष्टीने प्रसंग आल्यास आपण काय करू शकतो याचा एक संदेश शिवसेना शिंदे पक्षालाही देण्याचा प्रयत्न झाला आहे. या सर्व धामधुमीत उपमुख्यमंत्री शिंदे यांचा दिल्ली दौरा आणि त्यानंतर थेट आपल्या गावी जाण्याचा निर्णय हा योगायोग तर नव्हे अशीच आता राज्याच्या राजकीय वर्तुळात कुजबुज पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com