Sanjay Raut | Uddhav Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik MLC : नाशिकमध्ये भुजबळांच्या उमेदवाराला आसमान दाखवणाऱ्या शिवाजी सहानेंचा ठाकरेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप!

Sanjay Raut Controversy : खासदार संजय राऊत मुंबईला रवाना होताच शिवसेना ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेवकाने आरोपाचा बॉम्ब फोडला आहे. माजी नगरसेवक शिवाजी सहाने यांनी केलेल्या आरोपाने खळबळ उडाली. या संदर्भात संजय राऊत पुन्हा एकदा चर्चेत आलेत.

Sampat Devgire

Nashik News, 04 News : नाशिक विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने उमेदवार दिला नाही. त्याचे खासदार संजय राऊत यांनी समर्थन केले होते. मात्र याच प्रश्नावर राऊत यांच्यावर गंभीर आरोप झाला आहे.

खासदार संजय राऊत मुंबईला रवाना होताच शिवसेना ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेवकाने आरोपाचा बॉम्ब फोडला आहे. माजी नगरसेवक शिवाजी सहाने यांनी केलेल्या आरोपाने खळबळ उडाली. या संदर्भात संजय राऊत पुन्हा एकदा चर्चेत आलेत.

विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या दोन माजी आमदारांनी अर्ज नेले होते. मात्र ऐनवेळी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. त्याचा फायदा शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना झाल्याचा दावा केला जात आहे.

या प्रश्नावरून शिवसेना ठाकरे पक्षातच आरोप-प्रत्यारोप झाले होते. काही नेत्यांनी याबाबत गंभीर आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली. त्यावर संजय राऊत यांनी बुधवारी स्पष्टीकरण दिले होते. खासदार राऊत यांच्या स्पष्टीकरणाचा माजी नगरसेवक शिवाजी सहाने यांनी समाचार घेतला आहे.

ते म्हणाले, शिवसेनेचे फक्त 70 मतदान असताना मी उमेदवारी घेतली होती. मी निवडून देखील आलो होतो. सत्तेचा दुरुपयोग करून माझी मार्ग रोखण्यात आला. निवडणूक लढविण्यासाठी मतांचे आकडेवारी नव्हे तर राजकीय इच्छाशक्ती आणि धैर्य असावे लागते.

संजय राऊत हे नाशिकचे संपर्क प्रमुख आहेत. निवडणुकीतून माघार घेण्याऐवजी त्यांनी स्वतः येथून उमेदवारी करण्याचे धैर्य दाखवायला हवे होते, असे आव्हान सहाने यांनी दिले. यापूर्वी देखील खासदार राऊत यांनी माझी उमेदवारी रोखण्यासाठी राजकारण केले होते, असा गंभीर आरोप सहाने यांनी केला.

नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देण्यासाठी मला पक्षातून बाहेर काढण्यात आले. शिवसेना ठाकरे पक्षात राऊत यांनी केलेले हे राजकारण नाशिकच्या प्रत्येक नेत्याला माहित आहे. राऊत यांनी सध्याच्या विधानपरिषद निवडणुकीत कच खाल्ली, असा आरोप देखील सहाने यांनी केला आहे. त्यांनी या आरोपांचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT