Nanded MLC Election: नांदेड विधानपरिषदेत ट्विस्ट; दगाफटक्याची शक्यता; अशोक चव्हाण-चिखलीकरांची ऐनवेळी 'गेमचेंजर' खेळी

महायुतीत असले तरी एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले हे दोन नेते बऱ्याच महिन्यांनी एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. मुंबईत महायुतीच्या नेत्याची बैठक झाल्यानंतर उद्या, गुरुवारी अशोक चव्हाण-प्रताप पाटील चिखलीकर हे संयुक्तपणे पत्रकार परिषद घेऊन महायुतीची भूमिका मांडणार आहेत.
Ashok Chavan Pratap Patil Chikhalkikar
Ashok Chavan Pratap Patil Chikhalkikar sarkarnama
Published on
Updated on

रामेश्वर काकडे

Nanded MLC News : नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतांना राष्ट्रवादीचे नेते आमदार प्रताप पाटील चिखलीकर, शिवसेनेचे हेमंत पाटील यांना निमंत्रण नव्हते. यावरून या दोघांनी 'एकीकडे महायुती म्हणायचे आणि निमंत्रणही द्यायचे नाही' असा टीकेचा सूर दोघांनीही काढला होता. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी काहीसे नमते घेत राजूरकरांना दगाफटका होऊ नये म्हणून चिखलीकरांशी जुळवून घेतले आहे.

महायुतीत असले तरी एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले हे दोन नेते बऱ्याच महिन्यांनी एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. मुंबईत महायुतीच्या नेत्याची बैठक झाल्यानंतर उद्या, गुरुवारी अशोक चव्हाण-प्रताप पाटील चिखलीकर हे संयुक्तपणे पत्रकार परिषद घेऊन महायुतीची भूमिका मांडणार आहेत.

यावरून महायुतीत दिलजमाई झाल्याचे चित्र असले तरी प्रत्यक्षात मतदान होईपर्यंत काही सांगता येत नाही. तूर्त महायुतीचे जमले महाविकास आघाडीचे काय? अशी चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.

भाजपचे अमरनाथ राजूरकर आणि काँग्रेसचे रामदास पाटील सुमठाणकर यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता असताना खासदार अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर येत आहेत. महायुतीकडून भाजपचे अमरनाथ राजूरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रताप पाटील चिखलीकर यांचे पुत्र प्रवीण चिखलीकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते.

Ashok Chavan Pratap Patil Chikhalkikar
Abdul Sattar News: मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीनंतर बंडाचं निशाण फडकवलेल्या शिवसेनेच्या अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा; म्हणाले...'

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही पदाधिकाऱ्यांमध्येही स्वतंत्र भूमिका घेण्याबाबत चर्चा सुरू असल्याने महायुतीसमोर अंतर्गत समन्वयाचे आव्हान निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी मुंबईत महायुतीतील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर महायुतीच्या घटक पक्षांनी भाजपच्या अधिकृत उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे निर्देश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्याचे सांगीतले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचा पाठिंबा राजूरकर यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

चव्हाण-चिखलीकर एकत्र

या वेगवान घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्या, गुरुवार 4 जून रोजी अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर यांची संयुक्त पत्रकार परिषद नांदेडमध्ये होणार आहे. यातूनच विधान परिषद निवडणुकीसंदर्भातील महायुतीची भूमिका स्पष्ट केली जाण्याची शक्यता आहे.

राजकीयदृष्ट्या महत्त्वाची बाब म्हणजे यापूर्वी विविध निवडणुकांमध्ये आणि राजकीय सभांमधून अशोक चव्हाण व प्रताप चिखलीकर यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली होती. बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे आता दोन्ही नेत्यांना महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी एकत्र येण्याची वेळ आली आहे.

Ashok Chavan Pratap Patil Chikhalkikar
Mamata Banerjee News: ममता बॅनर्जींना 24 तासांतच दोन धक्के, टीएमसी पक्ष फुटल्यानंतर भाचे अभिषेक बॅनर्जींची धडधड वाढवणारी अपडेट

मविआतील मतभेदाचे काय?

दुसरीकडे महाविकास आघाडीतही सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू आहे. काँग्रेसने रामदास पाटील सुमठाणकर यांना उमेदवारी दिली असली तरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार नागेश पाटील यांचे सुपुत्र कृष्णा पाटील आष्टीकर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने काही प्रमाणात नाराजीचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीमध्येही अंतर्गत मतभेद पूर्णपणे मिटले आहेत का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com