Dombivli Politics : विधान परिषदेची धामधूम सुरू असतानाच शिंदेंनी डाव टाकला; भाजप नेत्यांसह शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

Dombivli BJP Leaders Join Shivsena : भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक, मनीषा धात्रक, प्रमिला चौधरी आणि श्रीकर चौधरी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी या सर्व माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.
Eknath Shinde
Eknath Shinde sarkarnama
Published on
Updated on

Dombivli News, 04 Jun : एकीकडे राज्यभरात विधान परिषद निवडणुकीची धावपळ सुरू असतानाच दुसरीकडे डोंबिवलीत मोठी राजकीय घडामोड घडली आहे. ती म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत भाजपच्या चार माजी नगरसेवकांसह विविध पक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे.

त्यामुळे डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू असल्याचं दिसत आहे. तर हा पक्षप्रवेश येणाऱ्या काळासाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत पिंपळेश्वर महादेव मंदिर परिसरात पार पडला.

भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक, मनीषा धात्रक, प्रमिला चौधरी आणि श्रीकर चौधरी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी या सर्व माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. भाजपच्या नगरसेवकांसह ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख योगेंद्र भोईर, केडीएमसीच्या निवृत्त सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला.

Eknath Shinde
Shivsena News : एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर रात्री खलबते, सत्तारांकडून तक्रारींचा पाढा; आमदारांनीही सांगितला भाजपचा जाच!

पक्ष प्रवेशानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीवर भाष्य केलं. शिवसेनेच्या दोन जागा बिनविरोध होण्याबाबत सकारात्मक संकेत देत त्यांनी सरकारवर सर्वांचा विश्वास असल्याने याबाबत सकारात्मक निर्णय होऊ शकतो, असंही म्हटंल.

Eknath Shinde
Nanded MLC Election: नांदेड विधानपरिषदेत ट्विस्ट; दगाफटक्याची शक्यता; अशोक चव्हाण-चिखलीकरांची ऐनवेळी 'गेमचेंजर' खेळी

दरम्यान, केडीएमसी निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने शैलेश धात्रक आणि मनीषा धात्रक यांनी मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. तर श्रीकर चौधरी यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. आता या सर्व नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे आगामी काळात डोंबिवलीच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com