Narendra Darade Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik: भाजप बंडखोर गोकुळ गितेंच्या मागे उद्धव ठाकरेंची ताकद? एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराला पाडण्यासाठी नाशिकमध्ये हालचाली

Nashik MLC Election, Narendra Darade, Shiv Sena UBT: नाशिक विधानपरिषद निवडणुकीपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मतदारांना एकत्र करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यावरील राजकीय दबाव वाढला आहे.

Sampat Devgire

Nashik election political equations: विधानपरिषद निवडणुकीचे मतदान दोन दिवसांवर आले आहे. नाशिकमध्ये मैदानात प्रतिस्पर्धी उमेदवार नसल्याचा दावा महायुतीने केला आहे. मात्र नगरसेवक आणि मतदारांमध्ये अस्वस्थतेच्या बातम्यांनी महायुतीची चिंता वाढवली आहे.

नाशिक विधानपरिषदेसाठी १८ जूनला मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडीच्या मतदारांना संघटित करण्याचा प्रयत्न करीत आहे. बुधवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांची बैठक होत आहे. या संदर्भात आज सायंकाळी शिवसेना नेते संजय राऊत वरिष्ठांचा संदेश स्थानिक नेत्यांना कळविणार आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकनाथ शिंदे हे पहिल्या क्रमांकाचे विरोधक आहेत. त्या दृष्टिकोनातून मतदारांना मतदानाच्या आधी संदेश देण्यात येणार आहे. याबाबत संजय राऊत यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर उद्या पक्षाच्या सदस्यांची बैठक होणार आहे.

महाविकास आघाडीच्या मतदारांच्या हालचाली अचानक वाढल्या आहेत. अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनीही नरेंद्र दराडे यांना पाठिंबा दिला नाही याचा पुन्हा एकदा पुनरुचार केला आहे. प्रचार सुरू आहे असे त्यांनी सांगितले. मात्र, त्यांची ही राजकीय खेळी आहे की महायुतीच्या उमेदवाराला अस्वस्थ करण्याचा डाव? हे येत्या दोन दिवसात स्पष्ट होईल.

नाशिकच्या निवडणुकीत मालेगावमधील MIM आणि इस्लाम पक्ष महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. त्यांच्याकडे जवळपास ७० मते आहेत. येथील दोन्ही पक्षांचा भाजपला कट्टर विरोध आहे. त्यामुळे त्यांचा मतदानाविषयी काय निर्णय होतो याला महत्त्व आहे.

या घडामोडींमुळे महायुतीच्या मतदारांमध्येही आपल्याला उमेदवारांकडून 'काही भाव' मिळणार की नाही? याबाबत अस्वस्थता आहे. याविषयी महायुतीचे मतदार आणि त्यातील पुढाकार घेणारे नेते संघटित झाले आहे. यांनी त्या दृष्टीने उमेदवारावर दबाव निर्माण केल्याची चर्चा आहे. त्यामुळे निवडणूक जवळ आल्याने उमेदवार दराडे यांची अस्वस्थता अधिकच वाढली आहे.

शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे समर्थक सध्या विरोधक काय डावपेच आखतात यावर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे उमेदवार दराडे काल दिवसभर नाशिक शहरातील विविध नेत्यांच्या संपर्कात होते. त्यांनी अनेक उमेदवारांच्या निकटवर्तीयांशी देखील संपर्क साधला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT